पुणे दि२३ :- शोटोकोन दो गोवा यांच्यातर्फे येत्या 24 आणि 25 ऑगस्ट रोजी तिसरी राष्ट्रीय कराटे स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा पर्वरी येथील गाडगे महाराज मेमोरीअल सभागृहात आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष सुभाष शिरोडकर यांनी दिली.
यावेळी सरचिटणीस नंदकुमार फडके, उपाध्यक्ष रक्षदा आर्लेकर, आयोजक देवेंद्र आर्लेकर, कॉमिलिना मातेरी आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेला कराटे खेळाडूंचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली, तेलंगणा, आसाम आणि गोवा या सहा राज्यातील 500 खेळाडू सहभागी होणार आहेत.या स्पर्धेत 6 ते 21 वर्षापर्यंत 8 वयोगटात तर 21 वर्षावरील गटांचा वेगळा समावेश करण्यात आला आहे, असेही शिरोडकर यांनी नमूद केले.
या स्पर्धेला मिळणारा वाढता प्रतिसाद बघून आम्हाला आनंद होत आहे.
या स्पर्धेचे उदघाटन गोव्याच्या कराटे असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश काकुली यांचे हस्ते होणार आहे, असेही त्यानी सांगितले.