- सामाजिक कार्यकर्ते हे देशाचे भूषण – महापौर
पुणे, दि.23 – समाजातील सर्व स्तरावरील लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन प्रयतशील असते. मात्र, समाजात मदतीची गरज असणारे वेगवेगळे वर्ग आहेत. या सर्वांन पर्यंत शासनाला पोहोचता येत नाही. सामाजिक कार्यकर्ते अशा ठिकाणी जाऊन मदत करीत असल्याने सामाजिक कार्यकर्ते हेच देशाचे खरे भूषण आहेत, असे मत महापौर मुक्ता टिळ यांनी व्यक्त केले.
सामाजिक कार्यकर्ते हरिओम मालशे याचा नुकताच मुक्ता टिळक यांच्या हस्ते गौरव करण्यात आला . त्यावेळी टिळक बोलत होत्या. यावेळी राजू नानजकार, संगीता करंदीकर, सुवर्णा बोर्डे, सुरेश परांजपे आदी उपस्थित होते.
निरपेक्षवृत्तीने काम करणाऱ्या मालशे सारख्या सामाजिक कार्यकर्ते हे समाजापुढे आले नाहीत. अशा कर्तृत्ववान कार्यकर्त्यांची दाखल घेऊन त्यांचा गौरव केला पाहिजे, असेही टिळक यांनी सांगितले.
लोकसहभागातून अनेक संस्थांच्या उभारणीत तसेच गरजूना मदत केली आहे. माझा सन्मान झाल्याने आता माझ्यावरील कामाची जबाबदारी वाढली आहे, असे सत्काराला उत्तर देताना मालशे म्हणाले.