पुणे दि, २९ :- केंद्रशासनामार्फत संपूर्ण देशात प्रथमत: ‘‘तंदुरुस्त भारत” अर्थात ‘‘फिट इंडिया मुव्हमेंट” या उपक्रमाच्या शुभारंभा प्रसंगी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘‘फिट इंडिया मुव्हमेंट” संदर्भात मार्गदर्शन केले. दुरदर्शनच्या वाहिनीवरुन करण्यात आलेले प्रक्षेपण पुणे महानगरपालिकेच्या मुख्य भवनातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहातील (जुने सभागृह) दुरदर्शन संचावरुन पहाणेकरिता नियोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी मा. महापौर सौ. मुक्ता शैलेश टिळक, मा. सौ. ज्योती कळमकर, मा. सौ. मनिषा लडकत, मा. अजय खेडेकर, मा. सौ. आरती कोंढरे, सहमहापालिका आयुक्त ज्ञानेश्वर मोळक, मुख्य कामगार सल्लागार शिवाजी दौंडकर, उपायुक्त मा. डॉ. वनश्री लाभशेटवार व अन्य अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने याप्रसंगी उपस्थित होते.
हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा २९ ऑगस्ट जन्मदिन हा क्रीडादिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त आजपासून राष्ट्रीय स्तरावर ‘‘तंदुरुस्त भारत” अर्थात ‘‘फिट इंडिया मुव्हमेंट” उपक्रम केंद्रशासनाचे वतीने सुरु करण्यात आलेला आहे. या संदर्भात मार्गदर्शन करताना मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल कि, या उपक्रमा अंतर्गत प्रामुख्याने शारिरिक तंदुरुस्ती राखण्याकरिता तसेच आळसपणा झटकून दैनंदिन व्यायाम, खेळ याकरिता प्राधान्याने वेळ काढून व्यायाम करणे, आवडीचे खेळ खेळणे, ज्यामुळे शरीर स्वास्थ्य उत्तम राहून दीर्घकाळ आरोग्य उत्तम रहाते, निरोगी जीवन जगणे यामुळे सहज सुलभ होते. दैनंदिन व्यायाम करणे, खेळ खेळणे याकरिता कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करावी लागत नाही, मात्र फायदे हे आयुष्यभराकरिता लाभतात. जागतिक स्तरावरील अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया या देशातून मोठ्या प्रमाणावर हे उपक्रम राबविले जात आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा सहभाग आहे. भारतातील नागरिकांनी अशा उपक्रमाचा स्वत:च्या तंदुरुस्तीकरिता लाभ घेतल्यामुळे स्वत:चेच आरोग्य, तब्येत उत्तम राहून आयुष्यभरातील जीवन प्रवास आरोग्यदायी, निरोगी होण्यास मदत होईल व सदरचा उपक्रम हा पुढील काळात जनआंदोलन होईल. केंद्रशासनाने हा उपक्रम सुरु केलेला आहे, परंतु पुढील काळात हा उपक्रम नागरिकांनाच चालवावा लागेल. ‘‘स्वच्छ भारत अभियानात” देशातील अनेक नागरिकांनी सहभाग घेऊन हा उपक्रम यशस्वी करुन आपलासा केला आहे. त्याचप्रमाणे स्वत:च्या तंदुरुस्ती, स्वास्थ्य, निरोगी जीवनाकरिता आवश्यक ‘‘तंदुरुस्त भारत” अर्थात ‘‘फिट इंडिया मुव्हमेंट” हा उपक्रमही नागरिक आपलासा करुन यशस्वी करतील असे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभारंभ प्रसंगी मार्गदर्शन करताना सांगितले.