मुंबईतील दुसर्या क्रमांकाचा मतदारसंघ दहिसर हा आहे. या मूळचा ठाणे जिल्ह्याचा हिस्सा असलेला दहिसर १९५६ मध्ये मुंबईला जोडला गेला. त्यामुळेच मुंबईचं उत्तरेकडचं टोकाचं ठिकाण म्हणून हा मतदारसंघ ओळखला जातो तसेच दहिसर हे मुंबईतील सर्वात शेवटचा टोल नाका आहे. दहिसर हे मुंबई शहराच्या पश्चिमेकडील उपनगरांमधील उत्तरेकडचे रेल्वे स्थानक आहे. हे मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम रेल्वे मार्गावर आहे. हे स्थानक मुंबई महानगरातील शेवटचे रेल्वे स्थानक असून येथे केवळ लोकलगाड्या तसेच काही लांबपल्ल्याच्या गाड्या थांबतात.
विजयी उमेदवार – मनिषा चौधरी, (भाजप)
पराभूत उमेदवार : विनोद घोसाळकर, (शिवसेना)
मतदारसंघ क्रमांक – १५३
मतदारसंघ आरक्षण – खुला
मतदारांची संख्या
पुरुष – १,६९,६६४
महिला – १,४६,९०९
२०१४मध्ये मनीषा चौधरी या पहिल्यांदाच विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. मात्र, याआधी त्यांनी भाजपच्या रचनेमध्ये विविध पदांवर भूमिका पार पाडली आहे. २००९पासून त्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य देखील राहिल्या आहेत. याशिवाय मुंबई महानगर पालिकेमध्ये त्याच वर्षी त्या निवडून देखील आल्या होत्या. ठाण्यामध्ये त्यांनी भाजपच्या विविध समित्यांवर कामगिरी बजावली आहे तर विनोद घोसाळकर देखील आक्रमक नेते आहेत त्यांनी 2009 मध्ये आमदार म्हणून ते निवडून गेले होते तसेच ते औरंगाबाद शिवसेना संपर्कप्रमुख म्हणून देखील चांगले काम केले आहे. 2018 मध्ये त्यांची मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ याच्यावरही निवड झाली आहे.
दहिसर मतदारसंघात नेहमीच भाजपा शिवसेनेचा करिश्मा पहिला मिळाला आहे. आता जवळ पास कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन विकास आघाडी ही जोरदार पणे उतरणार असल्याने आता कोणाची युती कोणा बरोबर होणार की स्वतंत्र लढणार आता याकडे सर्वाचे लक्ष्य लागले आहे.
विधानसभा निवडणूक २०१४ निकाल
१) मनिषा चौधरी, भाजप – ७७,२३८
२) विनोद घोसाळकर, शिवसेना – ३८,६६०
३) शीतल म्हात्रे, काँग्रेस – २१,८८९
४) शुभा राऊळ, मनसे – १७,४३९
५) नोटा – १९०७
मतदानाची टक्केवारी – ५०.५० %
संकलन : पत्रकार बाळू राऊत