इंदापूर दि,१८ :- सराटी तालुका इंदापूर येथे जिजामाता विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ही मागणी करण्यात आली
सराटी तालुका इंदापूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांना तिकीट देण्यास तालुका नेते व कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये आलबेल नाही त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये बंडखोरीची भाषा करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत
ही मागणी करण्यात आली असून ज्येष्ठ नेते अशोक घोगरे भाऊसाहेब सपकाळ प्रभाकर खाडे यांनी चार ते 5 हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ही मागणी करण्यात आली इंदापूर तालुक्याचा ढाण्या वाघ अप्पासाहेब जगदाळे यांना तिकीट देण्याची आग्रह मागणी या वेळी करण्यात आली वंचित विकास आघाडी कडून इच्छुक असलेले डॉक्टर शशिकांत तरंगे यांची इच्छुक सात मधून यांना तिकीट मिळेल त्यांना निवडून आणण्याची ग्वाही यावेळी देण्यात आली
मेळाव्यात भरणे यांनी पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला
ज्या ग्रामपंचायतींना दोन कोटी रुपयाचा निधी आमदार भरणे यांनी दिला मात्र त्या ग्रामपंचायतीवर पक्षाचा झेंडा फडकला नाही जुन्या कार्यकर्त्यांना डावलत असल्याचा आरोप सर्वांनी केला यावेळी एक नेता एकच पद हवे अशी मागणी करण्यात आली
इंदापूर मधून सात राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार आहेत मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे
संस्थापक अध्यक्ष शरद पवार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार सुप्रियाताई सुळे यांचा निर्णय सर्वांनी मान्य करण्याचे ठरवले आहे
सभापती आप्पासाहेब जगदाळे यांना
येणाऱ्या 2019 च्या निवडणुकीसाठी पक्षाचे तिकीट मिळावे व दत्तामामा दत्तात्रेय भरणे यांनी
एक वेळ मागे घ्यावे व अप्पासाहेब जगदाळे यांना उमेदवारी देऊन त्यांना निवडून आणावे अशी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते व जनतेतून मागणी होत आहे
मेळाव्यात आमदार दत्तात्रय भरणे व जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम सभापती प्रवीण माने उपस्थित नव्हते
या निर्धार मेळाव्यानिमित्त तालुक्यातील कार्यकर्ते प्रत्येक गावागावांमधून महिला वर्ग व तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होऊन हा मेळावा संपन्न झाला
या निर्धार मेळाव्यानिमित्त सभापती अप्पासाहेब जगदाळे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अशोक भाऊ घोगरे भाऊसाहेब सपकाळ
डॉक्टर शशिकांत तरंगे ननवरे आप्पा बाळासाहेब घोलप राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अमोल भिसे यांची प्रास्ताविक भाषणे झाली
कार्यक्रमानिमित्त सर्वच तालुक्यातील सरपंच उपसरपंच सर्व सहकारी ग्रामस्थ प्रदीप मामा जगदाळे अमर जगदाळे श्रीकांत दंडवते श्रीकांत बोडके राजेंद्र मोहिते सोमनाथ मोहिते अमोल राजे मोहिते संतोष सुतार अशोक बळते अरुण शिरसागर आनंद काकडे अण्णा साहेब काळे उपस्थित राहून कार्यक्रमाला शोभा आली
बाळासाहेब सुतार निरा प्रतिनिधी