नीरा नरसिंहपूर :दि.19 :- शहाजीनगर(ता.इंदापूर)येथिल निरा भिमा सहकारी साखर कारखान्याच्या चालू असलेल्या शहाजीनगर, खोरोची व शिरसाटवाडी येथिल जनावरांच्या छावणीस माजी मंञी हर्षवर्धन पाटील यांनी आज (गुरुवारी)भेट दिली.यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी शेतक-यांशी अडीअडचणीसंदर्भात चर्चाही केली.
निरा भिमा कारखान्याच्या या 3 छावण्यामुळे शेतक-यांना आधार मिळालेला आहे.उशीरा का होईना सध्या पाऊस चालू झाला आहे.आणखी चांगला दमदार पाऊस पडावा अशी अपेक्षा यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली.
प्रास्ताविकात कार्यकारी संचालक धीरजकुमार माने यांनी सांगितले की,निरा भिमा कारखान्याच्या या 3 छावन्यामध्ये एकूण 3640 जनावरे दाखल आहेत.या भेटीच्या वेळी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार,उपाध्यक्ष कांतिलाल झगडे,उदयसिंह पाटील,विलासराव वाघमोडे, विकास पाटील, अनिल पाटील,धनंजय कोरटकर, तानाजीराव देवकर,रणजित रणवरे,अजिनाथ बोराडे, प्रतापराव पाटील, प्रल्हाद शेंडे, शंकर घोगरे, दादासाहेब घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहीते, सतीश अनपट, नामदेव किरकत, चंद्रकांत भोसले, शिवाजी हांगे,शिवाजी शिंदे,तानाजी नाईक,गोविंद रणवरे,युवराज रणमोडे,अनिल बोन्द्रे,अधिकारी, कर्मचारी,शेतकरी उपस्थित होते.