शिक्रापूर दि,२३:- पत्रकार सुनील भांडवलकर यांना 18 सप्टेंबर रोजी कोरेगाव भीमा येथे वाहतूक पोलिसांकडून अरेरावी, दमदाटी करत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. तसेच 20 सप्टेंबर रोजी पत्रकार विशाल वर्पे यांना शिक्रापूर येथे वाहतूक पोलिसांकडून धक्काबुक्की करत अरेरावी केल्याची घटना घडली आहे.
या दोन्ही घटनांच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ तसेच पुणे जिल्हा पत्रकार संघ या दोन्ही संघटनेच्या संयुक्त विद्यमाने सदर पोलिसांवर गुन्हे दाखल करून कारवाईची मागणी करण्यासाठी 22 सप्टेंबर 2019 रोजी शिक्रापुर पोलिस स्टेशन येथे लाक्षणिक उपोषण करत कारवाईची मागणी करण्यात आली आहे,
जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत पत्रकारांचा पोलिस स्टेशन समोर ठिय्या
पत्रकार संरक्षण समिती च्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे.पत्रकार संरक्षण समितीचे राज्य उपाध्यक्ष अनिल चौधरी, मार्गदर्शक डॉ. बळीराम ओहोळ, जिल्हाध्यक्ष नाथाभाऊ उंदरे,जिल्हाउपाध्यक्ष अशोक आव्हाळे, रवींद्र खुडे उपस्थित आहेत.