पुणे,दि २९ :- पुणे शहरात समर्थ पाे.स्टे.च्या हद्दीत दिनांक २८ रोजी पुणे शहर पोलिस युनीट १ कडील पो.ना. सचिन जाधव, यांना गोपनीय मिळालेल्या बातमीवरून पाेउप निरी यश बाेराटे व लहू सातपुते, व युनीट कडील स्टाफसह समर्थ पाे.स्टे.च्या हद्दीत सापळा रचून कारवाई केली असता, दाेन इसम
संशइतरीत्या दिसुन आले. त्यांना ताब्यात घेतले असताना त्यांना नाव पत्ता विचारता ते त्यांनी –
1) रामेश्वर हिरश्चंद्र देशमुख वय ३५, रा. औरंगाबाद व
2) विजय गणपत जगताप वय ३८ रा. औरंगाबाद असे असल्याचे सांगीतले. त्यांचेकडून अंदाजे पाच लाख रू. किंमतीचे वाघाचे कातडे, व चाळीस हजार रू.ची माे.सा. जप्त केली आहे. अंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याची किंमत सुमारे ४०,००,०००/- होउ शकते.सदर बाबत समर्थ पाे.स्टे. येथे गु र नं २९३/२०१९ अन्वये भारतीय वन्य प्राणी संरक्षण अधीनीयमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वपोनि बालक्रुष्ण क़दम करत आहेत .सदरची कारवाई ही मा श्री मोराले सााे अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे, मा श्री बच्चनसींग सााे पोलीस उपायुक्त गुन्हे व मा शिवाजीराव पाटील सााे सहा. पोलीस आयुक्त गुन्हे तसेच अरुण वायकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा -1पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली करणयात आली आहे.