निरा नरसिंहपुर दि ७ :- प्रतिनिधी . बाळासाहेब सुतार , इंदापूर तालुका इंदापूर तालुक्यातील शहाजीनगर येथे अज्ञात व्यक्तीचा व्यक्तीचा सापडल्याने खळबळ उडाली आहे. सदर व्यक्तीचा खून करून मृतदेह ट्रकच्या चेसीमध्ये ठेवल्याचे पोलिसांनी सांगितले. मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नसून सदर वर्णनाच्या व्यक्तीची ओळख असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे इंदापूर पोलिसांनी आवाहन केले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,इंदापुर पोलीस स्टेशनचे हद्दीत मौजे रेडा शहाजीनगर (ता. इंदापुर) येथील शहाजीराव पाटील शॉपींग सेंटर मधील रोहित किराणा अॅन्ड जनरल स्टोअरच्या समोरील रोडचे कच्चे साईडपट्टीवर पुर्वेकडे तोंडकरून उभे असलेल्या ट्रकटेलरचे चॅसिमध्ये दिनांक ०४/१०/२०१९ रोजी ०७:३० वा. चे पुर्वी एक पुरूष जातीचे अनोळखी इसम वय अंदाजे ३५ ते ४० वर्ष, रंग सावळा, सडपातळ बांधा, अंगात चॉकलेटी व काळया लाल चौखडा शर्ट व राखाडी रंगाचा बमुर्डा व पायामध्ये काळया रंगाची पॅरागॉन कंपनीची पावसाळी चप्पल असलेला अनोळखी इसमाच्या डोक्यावर कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी अज्ञात हत्याराने मारुन गंभीर दुखापत करून त्याचा खुन करून त्याचे प्रेत टेलरचे चॅसीमध्ये लपवुन ठेवलेल्या स्थितीमध्ये मिळुन आले आहे.सदर मयत इसमाची अद्याप पर्यत ओळख पटलेली नाही.तरी त्याचे बाबत व अज्ञात मारेक-याबाबत काही माहीती मिळाल्यास इंदापूर पोलिसांशी खालील फोन नंबरवर संपर्क करावा, असे पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे.
१.इंदापुर पोलीस स्टेशन ०२१११-२२३३३३,
२.पोलीस निरीक्षक मधुकर पवार इंदापुर पोलीस स्टेशन – ९८५०९९१८६५
३.सहा.पोलीस निरीक्षक ए.बी.जाधव – ९८२३३०८२३०