पुणे दि,१३ : -भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवार दि. १२ अॉक़टोबर रोजी प्रभाग क्रमांक ९ मध्ये आयोजित बाईक
रॅलीला तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेक तरुण भारतीय जनता पक्ष आणि शिवसेने झेंडे हातात रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.कोथरूड विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचारात चंद्रकांत दादा पाटील दिवसेंदिवस आपली पकड घट्ट करीत आहेत.महायुतीचे उमेदवार चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रचारार्थ बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले
होते. नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या बालेवाडी येथील कार्यालयापासून बाईक रॅलीला सुरुवात झाली. बालेवाडी गाव, बाणेर गाव,पासपोर्ट भवन,व पाषाण लिंक रोड, येथून माजी आमदार विनायक निम्हण व माजी नगरसेवक सनी निम्हण व शिवसेना भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या नेतृत्वाखाली सुतार वाडी,पाषाण गाव, शिवाजी पुतळा, लमाण वस्ती, संध्या नगर, सोमेश्वरवाडी, इथून ही रॅली मार्गस्थ झाली. तर सोमेश्वर मंदिर येथे रॅलीचा समारोप झाला. अनेक तरुण भारतीय जनता पक्ष आणि शिवसेने झेंडे हातात या रॅलीत मोठ्या संख्येने
सहभागी झाले होते. तर ठिकठिकाणी फटाक्याच्या आतिषबाजीने दादांचे जंगी स्वागत करण्यात आले.या रॅलीत कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रकाश तात्या बालवडकर, नगरसेविका ज्योतिताई कळमकर, स्वप्नाली ताई सायकर यांच्यासह भाजप, शिवसेना, रिपाइं, रासप, शिवसंग्राम, रयत क्रांतीचे सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते.पाषाण भागातील श्री सोमेश्वर मंदिर परिसरात रॅलीचा समारोप झाला. यावेळी दादांनी भगवान महादेवांची मनोभावे पूजा करुन, विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयासाठी महादेवांना साकडं घातलं.