इंदापूर:प्रतिनिधी दि.१५ :-इंदापूर मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय (आठवले गट) रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना या मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार व राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार सभेचे इंदापूर येथे गुरुवारी (दि.17) दुपारी 1.30 वा. आयोजन करण्यात आले आहे,अशी माहिती इंदापूर विधानसभा महायुतीचे प्रचार प्रमुख अॅड.कृष्णाजी यादव यांनी आज दिली.
इंदापूर येथे नवीन प्रशासकीय इमारती शेजारील भव्य पटांगणावर सदरची सभा होणार आहे.मुख्यमंत्र्यांची सभा होणार असल्याने महायुतीचे तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साही वातावरण निर्माण झालेले आहे. महायुतीचे इंदापूर तालुक्यातील नेते व कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांची सभा यशस्वी करण्यासाठी कामाला लागले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन प्रचारप्रमुख अॅड.कृष्णाजी यादव यांनी केले आहे.
प्रतिनिधी बाळासाहेब सुतार