मावळ दि,०८ वडगाव मावळ परिसरात माळीनगर येथील सॅफराॅन स्काय सोसायटीच्या एका बंद रो-हाऊसच्या खिडकी अडकलेल्या दोन गव्हाणी घुबडाच्या पिलांना पक्षीप्रेमीमुळे आणि वनविभागाच्या संस्थेच्या सदस्यांमुळे जीवदान मिळाले. त्याच्यावर प्रथमउपचार करून त्याला कात्रजप्राणी संग्रहाल्यात अधिवासात मुक्त करण्यात आले.वडगाव मावळ येथे गरूवारी (दि. ०७) सकाळी ११ वाजण्याच्या गव्हाणी जातीच्या घुबडाच्या पिलांचा आवाज येत असल्याचे पक्षीप्रेमी वडगावतील सामाजिक कार्यकर्ते सदाशिवराव गाडे व सोमनाथ वाडकर यांच्या कानी पडला. त्यांनी त्वरित वनविभाग कार्यलायाचे आधिकारी संदिप जांभुळकर यांच्याशी संपर्क साधला. वनविभाग आधिकारी घटनास्थळी पोहचले आणि त्या अडकलेल्या घुबडाच्या पिलांना ताब्यात घेतले. गव्हाणी जातीचे हे घुबडाची पिल्ले असल्याचे निदर्शनास आले.गव्हाणी घुबड हा जगातील सर्वात जास्त आढळप्रदेश असणारा पक्षी आहे. याला इंग्रजीमध्ये बार्ण आउल असे म्हणतात. गव्हाणी घुबड संपूर्ण भारतभर तसेच बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार या देशांसह जवळजवळ संपूर्ण जगभर आढळणारा पक्षी आहे.असे वनविभागचे आधिकारी जांभुळकर यांनी सांगितले.
सतिश सदाशिव गाडे प्रतिनिधी वडगाव मावळ पुणे