वडगाव मावळ दि,०८ :- मावळ तालुक्यात परतीच्या पावसामुळे अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे 100% पिकाचे नुकसान झाले असून शासनाने तात्काळ एकरी 50 हजार रुपये मदत द्यावी याबाबत मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.संपूर्ण मावळ तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा .मावळ तालुक्यात १५०० हेक्टर भातपीक कडधान्य व इतर पिकांचे नुकसान झाले तात्काळ पंचनामे करून एकरी पन्नास हजार रुपये भरपाई द्यावी वीजबीले 100% माफ करावी,अशा विविध मागण्या करण्यात आल्या.यावेळी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बबनराव भेगडे मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार सुनील शेळके संत तुकाराम साखर कारखान्याचे चेअरमन बापूसाहेब भेगडे माजी उपसरपंच पंढरीनाथ ढोरे ,अंकुश आंबेकर ,तुकाराम ढोरे पंचायत समिती सदस्य साहेबराव कारके ,नगराध्यक्ष मयुर ढोरे ,उपनगराध्यक्ष राहुल ढोरे नगरसेवक राजेंद्र कुडे ,सुदाम कदम,राजेश बाफना,नारायण ठाकर ,बाबाजी गायकवाड ,प्रविण ढोरे,कैलास गायकवाड शरद ढोरे निलेश म्हाळसकर,भाऊ कराळे,विनायक लंवगारे आदी उपस्थित होते.
सतिश सदाशिव गाडे :- प्रतिनिधी वडगाव मावळ पुणे