• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

लीग क्रिकेट स्पर्धेतून मिळणारा निधी सामाजिक संस्थांना देणार; संयोजकांची पत्रकार परिषदेत माहिती

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
10/11/2019
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पिंपरी (पुणे) दि, १० :- देशभरात विखुरलेला सिंधी समाज एकत्रित यावा, तंदुरुस्तीचे महत्व पटवून द्यावे, तसेच मोबाईल-इंटरनेटच्या जाळ्यात न अडकता मैदानावरील खेळण्याला प्राधान्य द्यावे यासाठी आयोजित केली जाणारी सिंधी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा यंदा २ डिसेंबर ते १८ डिसेंबर २०१९ या कालावधीत पिंपरी येथे रंगणार आहे. पिंपरी येथील एमसीसी, मृणाल क्रिकेट ग्राउंडवर या क्रिकेट स्पर्धा आयोजिल्या असून, त्याचे सिंधी प्रीमिअर लीग फेसबुक पेजवरून थेट प्रक्षेपण होणार आहे. स्पर्धेतून मिळालेला निधी सामाजउपयोगी आणि विधायक कामासाठी देण्यात येणार असल्याची माहिती कन्वल खियानी, हितेश दादलानी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कमल जेठानी, अंकुश मुलचंदानी, नरेश नशा, करण अस्वाणी, अवि तेजवानी, अवि इसरानी, रवी दर्यानी आदी उपस्थित होते.हितेश दादलानी म्हणाले, “पिंपरी चिंचवडमधील विविध क्षेत्रातील उदयोजक तरुणांनी एकत्र येऊन या क्रिकेट लीगचे आयोजन केले आहे. सिंधी प्रीमियर लीग सीजन २ चे उद्घाटन २ डिसेंबर रोजी होणार आहे. माजी रणजी क्रिकेटपटू कैलास घटानी, उद्योजक राजेश उत्तमचंदानी आणि रोहीत गेरा यांना उद्घाटन सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. खेळाडू, संघ मालक आणि विविध मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. या लीगच्या माध्यमातून तरुणांनाना इंटरनेटच्या जाळ्यातून बाहेर पडता यावे, लोकांना भेटावे, एकत्र खेळावे असा उद्देश समोर ठेऊन स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा देशातील सर्व सिंधी समाजपर्यंत पोहचवायची आहे. एक दिवस जगभरातील सर्व सिंधी समुदायांना आपापल्या शहरांमध्येही अशी स्पर्धा आयोजित करता यावी, हा यामागचा उद्देश आहे. ‘सिंधी फक्त व्यवसायापुरतेच आहेत’ हा समज खोडून काढावा यासाठीही आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत.”कन्वल खियानी म्हणाले, “गेल्या वर्षी पार पडलेल्या स्पर्धेस मोठ्या प्रमाणात खेळाडूंकडून प्रतिसाद मिळाला होता. फेसबुकवर जवळपास ५१ हजार लोकांनी ही स्पर्धा पहिली. त्यामुळे यंदा होत आलेल्या लीगसाठी व्यापक स्वरूप प्राप्त झाले असून, पुणे आणि लगतच्या भागातून मोठ्या प्रमाणात खेळाडू आणि प्रेक्षकांचा उत्साह पाहायला मिळत आहे. आयपीएलच्या धर्तीवर या स्पर्धेची रचना करण्यात आली आहे. स्पर्धेच्या उद्घाटनादिवशी प्रत्येक खेळाडूने आपल्या सात वर्षांखालील मुलांना बरोबर घेऊन येणे बंधनकारक करण्यात आले आहे, जेणेकरून संपूर्ण कुटुंब या स्पर्धेत सहभागी होईल. त्यातून याला क्रीडा महोत्सवाचे स्वरूप प्राप्त होणार आहे. आपली संस्कृती साजरी करणे आणि त्याचा प्रसार करणे हेही यामुळे साध्य होणार आहे. त्यातून सामाजिक संस्थांच्या माध्यमातून वंचितांच्या शिक्षणासाठी, विकासासाठी काम करणाऱ्या संस्थांना अर्थसहाय्य केले जाणार आहे. तीन सामाजिक संस्थांना प्रत्येकी ५१ हजार रुपये देणगी दिली जाणार आहे.”या स्पर्धेतील प्रत्येक संघाचे नाव सिंधी समाजाशी आणि संस्कृतीशी निगडित आहे. त्यामध्ये मस्त कलंदर (गीता बिल्डर्स, मयूर तिलवानी), सुलतान ऑफ सिंध (आशुतोष चंदीरमणि, चंदीरमणि असोसिएट्स), मोहेंजोदरो वॉरियर्स (मिलेनियम सेमीकंडक्टर, हरीश अभिचंदानी), सिंधफूल रेंजर्स (अनूप झमटानी, झमटानी ग्रुप), एसएसडी फाल्कन (विकी सुखवानी, सुखवानी लाइफस्पेस), इंडस डायनामॉस (सुमित बोदानी, शगुन टेक्सटाईल), दादा वासवानीज ब्रिगेड (अनिल अस्वाणी, अस्वाणी प्रमोटर अँड बिल्डर), झुलेलाल सुपरकिंग्ज (पियुष जेठानी, जेठानी ग्रुप), हेमू कलानी ग्लॅडिएटर्स (बिपिन डाखनेजा, ट्रिओ ग्रुप), गुरुनानक नाइट्स (प्रकाश रामनानी, पीव्हीआर टाईल्स वर्ल्ड), संत कंवरम रॉयल्स (राहुल लाडकानी, व्हीआरए रोहित सेल्स), आर्यन युनायटेड (राजीव मोटवानी, रोहित इन्फ्रा) अशी या संघांची नावे आहेत. स्पर्धेत १२ संघ असून १५१ खेळाडूची नोंदणी झालेली आहे. संघ विकत घेतलेल्या मालकांकडून २५ लाख आभासी (व्हर्च्युअल) चलनातून १५१ खेळाडूंचा लिलाव करण्यात आला.सुखवानी लाईफ स्पेसेस , बालाजी होम्स (चंडीरामणी असोसिएट्स), नुरिया होमेटेल हॉस्पिटॅलिटी (सागर व निखिल सुखवानी), रवि बजाज आणि रोहित तेजवानी, झिरो ग्रॅव्हिटी बार अँड किचन (ऋषी तेजवानी), उत्तम केटरर्स (नवजीत कोचर), बॉम्बे सॅन्डविच (मनीष मनसुखानी), विशाल प्रॉपर्टीज (विशाल तेजवानी) अँड सुखवानी बिल्डर्स (सुरेश सुखवानी), ट्रिनिटी ग्रीन्स (हितेश जेठानी, सागर मुलचंदानी), राजनीता इव्हेंट्स (निखिल अहुजा), क्लासिक कलेक्शन (नीरज चावला) यांचे या स्पर्धंसाठी सहकार्य लाभले आहे.

Previous Post

पुणे परिसरात’ड्राय डे’च्या दिवशी ‘दारु’ पिने पडले ‘महागात’,

Next Post

तळेगाव दाभाडे येथे दोन गटात तुंबळ हाणामारी! एकजण गंभीर जखमी

Next Post

तळेगाव दाभाडे येथे दोन गटात तुंबळ हाणामारी! एकजण गंभीर जखमी

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist