पुणे, दि, ११ :- पुण्याचे खास वैशिष्ट्य ठरलेल्या योग क्रीडा महोत्सवाच्या दुसऱ्या सत्राला रविवार, 17 नोव्हेंबर 2019 रोजी पूना क्लब येथे प्रारंभ होत आहे.महोस्तवाच्या संयोजकांनी आज या क्रीडा महोत्सवाच्या क्रीडा पत्रकासह क्रीडा ठिकाणाची घोषणा केली.
या महोस्तवाचे गेल्या वर्षी पहिले सत्र असूनही भरघोस प्रतिसाद मिळाला होता. यंदाच्या वर्षी या प्रतिसदात भर पडेल व गतवर्षी पेक्षा दुपटीहून अधिक प्रेक्षक सहभागी होतील, असा विश्वास संयोजकांनी व्यक्त केला.
योग या क्रीडा प्रकाराने बदलत्या युगामध्ये मोठ्या प्रमाणात गरज असलेल्या व्यायामाची उणीव भरून काढताना लवकरच प्रचंड लोकप्रियता मिळवली. परंतु हा क्रीडा प्रकार संथ किंवा कंटाळवाणा असल्याच्या किंवा केवळ महिलांसाठीच योग प्रकार असल्याच्या चुकीच्या पूर्व ग्रहांमुळे या क्रीडा प्रकारच्या प्रसारात अडथळे येत गेले. त्याचप्रमाणे पुण्यातील योगपटूंना योग्य व्यावसपीठाच्या अभावी, तसेच नवनव्या योग प्रकारच्या प्रशिक्षणाची सोय नसल्यामुळे याबाबतीत लोकप्रियतेला चांगलाच फटका बसला. त्यामुळे योगाविषयी लोकांच्या मनात असलेली कल्पना स्पष्ट करण्यासाठी तसेच तंदरुस्तीसाठी हा क्रीडा प्रकार किती उपयुक्त आहे, हे पटवून देण्यासाठी अशा प्रकारचा योग महोत्सव आयोजित करण्याची प्रेरणा सारिका साळवी वासुदेव आणि झाहबिया वोलबिक यांच्या मनात आली व त्यांनी या उपक्रमाला प्रारंभ केला.
गेल्या वर्षी या महोस्तवाचे पहिलेच वर्ष होते तरीही पुणेकरांनी या उपक्रमाला उत्साही प्रतिसाद दिला. त्यावेळी 200 हुन अधिक पुणेकरांनी आपला सहभाग नोंदविला होता. यापैकी प्रत्येक जण योग महोत्सवाबाबत पूर्णपणे सकारात्मक होता आणि त्यातून होणाऱ्या फायद्याबाबत समाधानी होत या महोत्सवात सहभागी झालेल्या योग शिक्षक व विदयार्थी या दोघांनाही योगविषयक माहितीची अदलाबदल करण्याची संधी मिळाल्याबाबद्दल आणि खुप काही शिकायला मिळाल्याबाबद्दल आनंद व्यक्त केला
पहिल्या वर्षीच्या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद ध्यानात घेऊन हा महोत्सव यावर्षी आणखी मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आला आहे.
यंदाच्या सत्रात विविध विषयांवर आधारित क्रीडा तज्ञ, डॉकटर योग व ध्यानधारणा प्रशिक्षक हे सर्व एकाच व्यासपीठावर येणार असून पूना क्लबच्या निसर्गसुंदर पार्श्वभूमीवर एकमेकांशी संवाद साधून योग या क्रीडा प्रकाराबाबत आदान प्रदान करणार आहेत.
यंदाच्या योग महोत्सवाचे उदघाटन कैवल्य धाम योगा इन्स्टिट्यूट या अतिशय जुन्या व प्रतिष्ठित संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी एमआयटी स्कुल ऑफ वेदिक सायन्सेस या संस्थेचे डीन डॉक्टर साई सुसारला उपस्थित राहणार आहेत.
यंदाच्या योग महोस्तवात तणाव मुक्तीसाठी ध्यान धारणाचे विविध प्रकार, विविध आसनांमुळे मिळणाऱ्या फायद्याचे महत्व, विविध नृत्य प्रकारांवर आधारीत उपचार पद्धती अशा विविध विषयांवरील प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यातील सर्व सत्रांमध्ये सहभागी होणाऱ्यांना विविध तज्ञ, तत्वज्ञानी विचारवंत आणि डॉकटर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. यंदाच्या वर्षी 400 हुन अधिक शिबीरार्थींचा सहभाग अपेक्षित असून पुणे हि भारताची योग राजधानी होण्याच्या दिशेने ह एक महत्वाचे पाऊल ठरणार आहे.
त्याचप्रमाणे पुण्याला भारताची आध्यात्मिक राजधानी म्हणून लौकिक मिळवून देणे हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे या महोत्सवाच्या संस्थापिका व मुख्य संयोजक सारिका वासुदेव यांनी सांगितले.
सारिका म्हणाल्या की, हे लक्ष साध्य करण्यासाठी पुण्यामध्ये दर्जेदार योग महोत्सवांचे आयोजन करणे आवश्यक आहे. गेल्या वर्षी पाहिल्या सत्राला मिळालेल्या प्रतिसादामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. यंदाचे वर्ष दुसरे वर्ष असून आम्ही आणखी नव्या योजना आखणार आहोत.
झाहबिया वोलबिक म्हणाल्या कि, आम्हांला या महोस्तवासाठी पूना क्लब यांचे सहकार्य लाभले असून गोक्यूआयआय हे हेल्थ पार्टनर आहेत.
अधिक माहितीसाठी www.puneyogutsav.comया वेबसाइटवर अथवा सारिका 8975550300किंवा झाहबिया 9975059574 आणि puneyogutsav@gmail.comया ईमेल आयडीवर संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांतर्फे करनण्यात आले आहे.