सातारा दि,१३ :-सातारा तालुका पोलीस ठाणचे हद्दीमधील नागेवाडी ता.जि. सातारा गावी असणारे क्रेशरचे खाणीजवळ डब्लूकुमार रामसुंदर सिंह रा. राणाबिगाह पटना राज्य बिहार याचा घातक हत्याराने डोक्यास गंभीर मारहाण करून खून झाले होता व सातारा तालुका पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर ठिकाणी मा, समीर शेख सहाय्यक पोलीस अधिक्षक, मा. सजन हंकारे पोलीस निरीक्षक सातारा तालुका पोलीस ठाणे यांनी घटनास्थळी भेट देवून सातारा तालुका पोलीस ठाणेचे डी.बी. पथकास मार्गदर्शन करून झाले गुन्हयातील आरोपीचा शोध घेणेबाबत सुचना दिल्या. त्याप्रमाणे डी.बी. पथकातील पो.हवा. दादा परिहार, पो.हवा, राजू मुलाणी, पो.ना. सुजीत भोसले पो.कॉ. रमेश चव्हाण यांनी संशयिताची गोपनियरित्या माहिती घेवून तो बिहार राज्यातील असल्याने बिहार मध्ये जावून शकतो या आधारे तांत्रिक तसेच गोपनीय माहितीदारामार्फत माहिती प्राप्त करून पुणे रेल्वे पोलीसांचे मदतीने संशयित इसमास शिताफीने लोणावळा येथे ताब्यात घेतले. संशयिताकडे गुन्हयाबाबत चौकशी करीत असताना झालेल्या प्रकारबाबत विचारलेल्या प्रश्नाना उडवाउडवीचे उत्तरे देवू लागला. त्यास पोलीस खाक्या दाखवताच त्याने मयत व्यक्ती नात्याने मामा असून तो माझेशी लैंगिक चाळे करीत असल्याने मी त्यांच्या त्रासाला कंटाळुन मी त्यांच्या डोक्यात घातक हत्याराने मारून त्यांचा खून करून पळून गेलो होतो असे प्राथमिक चौकशीत सांगितले आहे,
तेजस्वी सातपुते, पोलीस अधिक्षक सातारा,धीरज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक सातारा तसेच समीर शेख, सहाय्यक पोलीस अधिक्षक सातारा यांनी केलेल्या सुचनाप्रमाणे सजन हंकारे, पोलीस निरीक्षक सातारा तालुका पोलीस ठाणे यांनी त्यांचेकडील डी.बी. पथकास मार्गदर्शन करून डी.बी. पथकातील पो.हवा. दादा परिहार, पो.हवा. राजू मुलाणी, पो.ना. सुजीत भोसले पो.कॉ. रमेश चव्हाण पो. हया, राजेंद्र बंजारी, पो.ना. सयाजी काळभोर, पो.हवा. राजेंद्र तोरडमल, पो.हवा. आयाज बागवान, पो.कॉ. विश्वनाथ आंबाळे व रेल्वे पोलीस पुणे पो.हवा. अमरदिप साळुखे,पो.कॉ. विशाल पवार, पो.कॉ. सचिन पवार, पो.कॉ. सिद्धेश पाटील यांचे मदतीने अवघ्या १२ तासाचे आत उघड करून आरोपीस जेरबंद केले आहे. त्याचे याकामगिरीमुळे मा.तेजस्वी सातपुते पोलीस अधिक्षक सातारा, धीरज पाटील अप्पर पोलीस अधिक्षक सातारा तसेच समीर शेख सहाय्यक पोलीस अधिक्षक सातारा यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.