चाकण दि १४ :- व्याजाने दिलेल्या रकमेपोटी दुप्पट रक्कम वसूल करून दमदाटी करून, तेरा एकर जमीनही जबरदस्तीने खरेदीखत करून घेऊन जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी चाकण पोलिसांनी दि.13 रात्री उशिरा खराडी पुणे येथील दोन बड्या खासगी सावकारांवर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती चाकण पोलिसांनी दिली.
नंदा प्रताप खांडेभराड ( वय – रा. कडाची वाडी, ता. खेड, पुणे) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.आहे व चाकण पोलिसांनी धीरज धनाजी पठारे व उमेश उर्फ दादा खंडू खांदवे ( दोघेही रा. खराडी, पुणे ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.फिर्यादी व त्यांचे पती प्रताप खांडेभराड यांना 10 टक्के व्याज दराने दिलेले 1 कोटी 20 लाख रुपयांचे 12 लाख रुपये प्रती महिना या प्रमाणे 15 महिने व्याजापोटी 1 कोटी 80 लाख व त्यानंतर ३१ लाख रुपये असे 2 कोटी 11 लाख रुपये व्याज वरील दोघांनी जबरदस्तीने घेतले.आहे रांजणगाव, ढोक सांगवी येथील 13 एकर जमीन धमकावून खरेदीखत करून घेतली आहे व खांडेभराड यांना चाकण येथील घरी येऊन शिवीगाळ, दमदाटी करून व जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार चाकण पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. खांडेभराड यांच्या फिर्यादीवरून येथील पोलिसांनी वरील दोन जणांविरुद्ध महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम 2014 नुसार, 31,32, 44,45 त्याच प्रमाणे अन्य कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार पुढील तपास करीत आहे.