पुणे दि १९ : – कार्तिकी वारीतील अपघातामध्ये जखमी झालेल्या वारकऱ्यांची भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी पुण्यातील हडपसर येथील नोबेल हॉस्पिटल मध्ये जाऊन विचारपूस केली. अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर २४ जण जखमी झाले आहेत. जखमी वारकऱ्यांवर हडपसर येथील नोबेल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज (मंगळवार) दुपारी तीनच्या सुमारास नोबेल हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी वारकऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी भाजपच्या वतीने अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये नामदेव महाराजांचे १७ वंशज यांचा समावेश आहे. मृत झालेल्या दोघांच्या वारसांना चंद्रकांत पाटील यांनी ५ लाखांची मदत जाहीर केली.अतुल आळशी (वय-२४) आणि सोपान तुलसीदास नामदास (वय-३६) असे मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.सोपान नामदास आणि अतुल आळशी यांच्या वारसांना भाजपच्या वतीने प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केली. तर जखमी वाकऱ्यांच्या उपचाराचा खर्च भाजप करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या ७२४ वा संजीवन समाधी सोहळा कार्तिक वद्य त्रयोदशीला असून, या सोहळ्यासाठी पंढरपूरहून आळंदीकडे निघालेल्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांवर आळंदी पंढरपूर पालखीमार्गावर आज सकाळी नऊच्या सुमारास जेसीबी घुसला. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला तर 19 जण जखमी झाले आहेत तर दोन वारकऱ्यांची प्रकृती चिंताजन असल्याचे समजतेय.जखमी वारकरी विष्णू सोपान हळवाल (वय-35), शुभम नंदकिशोर अवारे (वय-23), दिपक अशोक लासुरे (वय-91), गजानन संतोष मानकर (वय-20), वैभव लक्ष्मण बराटे (वय-30), अक्षय अमृत मोकामपल्ले (वय-19), किर्तामान प्रकाश गिरजे (वय -23), आकाश माणिकराव भाटे (वय-30), ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ कदम (वय-40), गरोबा जागडे (वय-35), विनोद लहासे (वय-30), नामदेव पूंजा सागर (वय-34), महासाळकर (वय-258), गजानन मानकर (वय-20), सोपान निमनाथ मासाळकर (वय-25)