देहुरोड दि,२० :-रावण टोळीतील मोक्याच्या कारवाईत फरार असलेला म्होरक्या सराईत गुन्हेगारास देहूरोड पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून एक जुने वापरते गावठी पिस्तूल जप्त केली आहे. चिम्या उर्फ अमोल निजाप्पा गायकवाड (रा. जाधववस्ती, रावेत) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी दिलेल्या
माहितीनुसार, विनोद निजाप्पा गायकवाड हा रावण टोळीचा मुख्य सुत्रधार आहे. या टोळीने पिंपरी-चिंचवड शहरातील रावेत, काळेवाडी, आकुर्डी, निगडी, वाकड या भागात दहशत निर्माण केली होती. त्यामुळे पोलिसांनी विनोद गायकवाड आणि त्याच्या साथीदारांवर मोक्काची कारवाई करून त्याची कारागृहात रवानगी केली. विनोदची कारागृहात रवानगी झाल्यानंतर त्याचा भाऊ चिम्या गायकवाड याच्यावर देखील मोक्काची कारवाई झाली. मात्र, चिम्या मागील काही दिवसांपासून भूमिगत राहून ससा गायकवाड, सोन्या जाधव, नझीम व अन्य साथीदारांना घेऊन टोळी चालवत होता.तो मंगळवारी दि. १९रोजी देहूरोडजवळ चिंचोली गावाजवळ येणार असल्याची माहिती गुप्त बातमिदाराकडून मिळाली व देहूरोड पोलिसांना. त्यानुसार सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्तुल मिळाले. चिम्या २०१७ पासून मोक्कामध्ये फरार होता.सदर कामगिरी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई,पोलीस सह आयुक्त प्रकाश मुत्याळ,अति.पोलिस आयुक्त.रामनाथ पोकळे,पोलीस उपआयुक्त परि २ विनायक ढाकणे,सहा पोलीस आयुक्त देहुरोड संजय नाईकपाटील,यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक गज्जेवार, उपनिरीक्षक जगताप, गायकवाड पोलीस कर्मचारी शाम शिंदे, प्रीतम वाघ, राजेश कुरणे, परदेशी, खोमणे यांच्या पथकाने केली