पुणे दि २८ : – पुणे डीआरडीओ भारत सरकार या सेवेत मध्ये नोकरी लावण्याच्या बहाण्याने ५० हजार रुपये घेऊन फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत तरुणाने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जालना येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीने सरकारी नोकरीत नसताना त्याने तो भारत सरकारच्या सेवेत असल्याची बतावणी करून फिर्यादीला डीआरडीओमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी फिर्यादीकडून 50 हजार रूपये घेतले. त्यानंतर त्याच्या घरी नोकरीची खोटी आणि बनावट कागदपत्रे पाठवून नोकरी न देता फसवणूक केली. पुढील तपास वारजे पो.उप.निरी.ए.डी.येवले करीत आहेत