पुणे दि ०१ : -पुणे शहरात मध्यरात्रीनंतर सुरू असणार्या हॉटेल्स आणि पब वर गुन्हे शाखेने झाडाझडती घेतली. यादरम्यान, पोलिसांनी रात्री उशीरापर्यंत (वेळेच्या मर्यादेपेक्षा अधिक वेळ) सुरू असणार्या पंचतारांकित हॉटेल्ससह पबवर कारवाई करत त्यांच्यावर खटले दाखल करण्यात आले आहे. या कारवाईत १ लाख ८ हजाराचा दंड वसूल केला गेला आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी गुन्हे शाखेकडून अधून-मधून अचानक विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. तसेच, पाहिजे आरोपी, सराईत गुन्हेगारांची चेकींग केली जात आहे. उशीरापर्यंत सुरू असणार्या हॉटेल्सवरही कारवाई करण्यात येत आहे.दरम्यान, गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे व उपायुक्त बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी दोन दिवस रात्री अचानक विशेष मोहिमेद्वारे शहरातील हॉटेल्स आणि गुन्हेगारांची झाडाझडती घेतली. त्यावेळी पोलिसांनी विविध टोळीतील २० जण मिळून आले आहेत. तर एडीपीएस कायद्यातंर्गत चार जणांना पकडण्यात आले. मद्यपान करुन वाहन चालविणार्या दोघांनाही पोलिसांनी पकडले आहे. तसेच ५६ हून अधिक हॉटेल्स आणि पब पाहिल्यानंतर त्यातील २८ आस्थापनांवर कारवाई करत खटले दाखल केले आहेत. तर ३१ गुन्हेगारांना अटक करण्यात आली. आहे