पुणे दि ०५ :- राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने एक परिपत्रक काढून त्यात राज्यातील सर्व शासकीय,निमशासकीय कार्यालयात संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती येत्या रविवार दि.८ डिसेंबर रोजी साजरी करावी असे आदेश दिले असून त्याची पुणे शहरात सर्व शासकीय कार्यालयांनी अंमलबजावणी करावी अशी मागणी पुणे शहर व तालुका समस्त तेली समाजाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे श्री संताजी महाराज जगनाडे तेली संस्था,सुदुंबरे संस्थेच्या वतीने विभागीय आयुक्त पुणे या कार्यालयास संत संताजी महाराज यांची प्रतिमा भेट देण्यात आली. या प्रसंगी प्रतिमा स्विकारताना डॉ. दीपक म्हैसेकर विभागीय आयुक्त पुणे विभाग, पुणे व निवेदन दिले आहे.अशा लोकोपकारी संतांची जयंती साजरी करणे हे नव्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी अध्यात्मिक क्षेत्रातील दुर्मिळ उदाहरण असल्याने शासनाने त्या मागणीची उचित दाखल घेऊन या तेली समाज संघटनेची मागणी उचित ठरविल्यास वावगे म्हणता येणार नाही.व डॉ. दीपक म्हैसेकर विभागीय आयुक्त पुणे विभाग, पुणे यांनी प्रतिसाद चांगला दिला आहे.सदर प्रसंगी तेली समाजाचे
शिवदास उबाळे – अध्यक्ष सुदुंबरे संस्था, अॅड. राजेश येवले – मुख्य चिटणीस सुदुंबरे संस्था , रवींद्र शिंदे गंगाधर हाडके आदी मान्यवर उपस्थित होते.