नवी दिल्ली दि ०६ :- हैदराबाद सामुहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना पोलिसांनी एन्काउंटरमध्ये ठार केले आहे. या वृत्ताची सोशल मिडियावर चर्चा सुरू असतानाच साताऱ्याचे माजी खासदार आणि भाजपाचे नेते उदयनराजे भोसले यांनीही ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे.उदयनराजेंनी तेलंगण पोलिसांचे अभिनंदन केलं आहे. हैदराबाद सामुहिक बलात्कार प्रकरणातील चारही संशयित आरोपींना पोलिसांनी एन्काऊंटर
करत ठार केले आहे. गुन्हा घडल्याच्या ठिकाणी चौकशीसाठी नेले असता या चारही जणांनी घटना स्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी झालेल्या चकमकीमध्ये या चौघांना ठार करण्यात आल्याची माहिती तेलंगण पोलिसांनी दिली आहे. या एन्काउंटरवरमध्ये प्रमुख भूमिका बजावणाऱ्या आयपीएस अधिकारी व्ही. सी. सज्जनार हे सर्वांच्या चर्चेचे केंद्र स्थान आहेतही बातमी समोर आल्यानंतर अनेकांनी सज्जनार यांचे अभिनंदन केले आहे.व्ही. सी. सज्जनार यांनी रात्री तीन ते पहाटे सहाच्या दरम्यान हा एन्काउंटर केल्याची माहिती दिली आहे. अनेकांनी सज्जनार यांचे ट्विटवरुन अभिनंदन केले आहे