नीरा नरसिंहपूर: दि.११:- बावडा येथील दत्त मंदीरामध्ये बुधवारी (दि.११) सायंकाळी ६ वाजता श्री दत्तजन्मोत्सव सोहळा हजारो भाविकांच्या गर्दीत उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने दत्त मंदिरात आकर्षण विदयुत रोषणाई करण्यात आली आहे.बावडा येथे प्रसिद्ध दत्त बागेतील दत्त मंदीरामध्ये सकाळी निरा भिमा कारखान्याचे संचालक विकासनाना पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी राजश्री पाटील यांच्या शुभहस्ते महापूजा करण्यात आली.यावेळी जेष्ठ मार्गदर्शन विजयकुमार बाजीराव पाटील, निरा भिमा कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील,सरपंच किरण पाटील, अकलूजच्या मोहिते पाटील कारखान्याचे संचालक महादेव घाडगे,कैलास पाटील,मिलिंद पाटील व भाविक उपस्थित होते. मंदिरात सायंकाळी ४ ते ६ यावेळेत ह.भ.प.राम महाराज अभंग यांचे किर्तन झाले.या दत्त जन्मोत्सव सोहळ्यास माजी मंत्री हर्षवर्धन पाटील उपस्थित होते.कीर्तनानंतर सायंकाळी सुर्यास्थप्रसंगी उपस्थित हजारो भाविकांनी फुले टाकून श्री दत्त जन्मोत्सवाचा सोहळा साजरा केला.यावेळी ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येंने उपस्थित होते.
प्रतिनिधी बाळासाहेब सुतार इंदापूर पुणे