टेंभुर्णी दि ११:- टेंभुर्णी शहरात नाळे वस्तीवर भर दिवसा घर फोडून सोन्यासह रोखरक्कम 53 हजार असा एकलाख एकेविस हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी भर दिवसा लंपास केले असल्याचे टेंभुर्णी पोलीस ठाण्यात खबर जनार्धन सातपुते यांनी दिली आहे टेंभुर्णी पोलिसाकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की सोलापूर पुणे बायपास लगत असलेल्या नाळे वस्ती येथे वाहणाची खरेदी विक्री करणारे जनार्धन सातपुते यांच्या घराचे कुलूप तोडून व दरवाजाचा कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरामध्ये शिरून तीन रूममधील दोन्ही कपाटे फोडून एका राजारीणी कपाटाचा लॉक तोडून त्यातील दोन मंगळसूत्र
सोन्याची व एक सोन्याची अंगठी सोने व दुसऱ्या कपाटामध्ये रोख रक्कम 53 हजार रुपये घेऊन आतील घरातील तीन रूममध्ये सर्व सामान भाहेर फेकून आस्थव्यस्थ टाकुन देऊन व घरातील आवाज बाहेर जाऊ नये म्हणून घरातील वाशिंग मिशन चालू करून सोन्यासह रोख रक्कम 53 हजार रुपये असे एकूण एकलाख एकेविसहजार रुपायांचा ऐवज आज्ञान चोरटे भरदिवसा पुढील दरवाज्याला आतुन कडीलाऊन पाठीमागील दरवाज्यातून चोरटे फरार झाले असून हा प्रकार मंगळवारी सकाळी 9.30 ते 2 .30. वाजण्याच्या दरम्यान घडला असून सर्व घरातील सकाळी 9.30 वाजता सातपुते यांच्या मुलाचे लहानमुल इंदापूर येथील कदम हॉस्पिटल येथे आजारी असल्याने त्याला ऍडमिट केले होते व आज डिसचार्ज असल्याने सकाळी 9.30 वाजता घराला कुलुप लावून सर्वजण घरातील इंदापूर ला दवाखान्यात गेले होते याचा आज्ञान चोरट्यांनी गैरफायदा घेऊन मुद्देमालासह फरार झाले असून टेंभुर्णी परिसरात भरदिवसा चोरी झाल्याने टेंभुर्णी करात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून गेल्या वर्षापासून एक ही चोरीचा गुन्हा उघड झाला नसल्याने या गुन्ह्याचा तपास टेंभुर्णी पोलीस लावतील काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरी का पुढे पडला आहे. वरील घटणेची टेंभुर्णी पोलिसठाण्यात आज्ञान चोरट्यान विरोधात भा.द.वि.380/454 गुन्हा दाखल झाला असुन वरील तपास टेंभुर्णी पो.नि. राजेंद्र केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ए.पी.आय मगदुम व पो.ह. हनुमंत असबे तपास करीत आहेत
अनिल भागवत जगताप मु.पो.टेंभुर्णी ता.माढा जि सोलापुर प्रतिनिधी