दौंड दि २० :- पुणे दौंड तालुक्यातील वरवंड येथे बंद पडलेल्या ट्रकमधून सहा लाख अटठ्याऐंशी हजार रुपयांच्या लोखंडी प्लेट चोरून नेणाऱ्या आरोपीला पुणे ग्रामीण यवत पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी मंजुपटेल मैनुपटेल बिरादार, वय – ३६ वर्षे, व्यवसाय – ट्रान्सपोर्ट, रा. सेंट्रल फैसिलीगी बिल्डिंग नं.२, रूम नं. ४७९, वाशी सेक्अर नं. १९, नवी मुंबई हे १२ डिसेंबर रोजी बालाजी ट्रान्सपोर्ट प्रा. लि. यांच्या २४ टन ६०० किलो वजनाच्या ४ व ६ एम.एम.च्या लोखंडी पत्रा प्लेट ट्रक क्र. के.ए-५६-३६५५ मध्ये भरून तळोजा, नवी मुंबई येथुन पुणे मार्गे हैदराबाद, राज्य तेलंगाना येथे लोखंडी पत्रा घेऊन जात असतांना वरवंड, ता.दौंड, जि पुणे येथ ट्रकच्या इंजीनमध्ये बिघाड झाल्याने ट्रक बंद पडला होता.या वेळी ट्रक चालक यमणप्पा. पिरप्पा. कडीमणी. बिदर. कर्नाटक याने यातील फिर्यादीला फोन करून ट्रकच्या इंजीनमध्ये बिघाड झाल्याने ट्रक बंद पडला असुन मी ट्रक वरखंड येथे पेट्रोलपंपासमोर उभा केलेला आहे मी गावी बसवकल्याण,बिदर कर्नाटक येथे जावुन मेकॅनिकला घेवुन येतो असे सांगुन निघुन गेला होता. दरम्यान चालक यमणप्पा कडीमणी याने मॅकॅनिक घेवुन येवुन ट्रकचे इंजिन खोलुन काढुन ते दुरूस्तीसाठी बसवकल्याण कर्नाटक येथे घेवुन गेला होता. लोखंडी प्लेटचा माल ऑर्डरच्या ठिकाणी वेळेत न पोहचल्याने फिर्यादी यांना हैदराबाद येथुन माल घेणारे व्यक्तिचे वारंवार फोन येत असल्याने फिर्यादी यांनी माल दुसऱ्या ट्रकमध्ये भरून पाठवण्यासाठी ट्रक पाठवला असता त्यांना ट्रकमध्ये माल कमी आढळुन आला तेव्हा ट्रक चालकाने फिर्यादी व बालाजी ट्रान्सपोर्टचे मालक यांना माल कमी असल्याचे सांगितले. त्यामुळे फिर्यादी यांनी दि ०७ डिसेंबर रोजी यातील फिर्यादी व बालाजी ट्रान्सपोर्टचे मालक यांनी वरवंड येथे येवुन ट्रकची व मालाची पाहणी केली असता ट्रकमध्ये ११ टन लोखंडी पत्रा प्लेट मिळुन आल्या बाकीच्या १३ टन ६०० किलो लोखंडी पत्रा प्लेट मिळुन आल्या नाही सदरबाबत फिर्यादी यांनी ट्रक चालकास मालाबाबत चौकशी केली असता त्याने मालाबाबत मला काही माहिती नाही असे सांगितले त्यावरून फिर्यादीची खात्री झाली की आपण पाठवलेल्या मालापैकी आपला १३ टन ६०० किलो वजनाच्या ४ व ६ एम.एम.च्या लोखंडी पत्रा प्लेट किं.रू ६,८८,०००/-चा माल कोणीतरी चोरी करून चोरून नेल्या आहेत.व फिर्यादी यांनी यवत पोलीस स्टेशन येथे वरील मालाचे चोरीबाबत दि.१२ रोजी तक्रार दिली होती. सदरचा गुन्हा गंभिर स्वरूपाचा असल्याने पोलीस निरीक्षक भाउसाहेब पाटील यांनी पो.उप.निरी.रामचंद्र घाडगे, पो.ना.गणेश पोटे, पो.कॉ.विजय भापकर यांचे पोलीस पथकास गुन्हा तात्काळ उडाकीस आणणेबाबत सांगीतले होते सदरचा गुन्हा उघडकिस आणण्यात कसलाही पुरावा नसल्याने पोलीसांसमोर मोठे आव्हाण होते. पोलीस पथकाने अत्यंत कसोशीने बसवकल्याण, कर्नाटक व हैदराबाद, तेलंगाना या राज्यात जात तपास करून गुन्हा उघडकिस आणत आरोपी जहिर सुल्तान बागवान उर्फ मोहम्मद जहिर सुलतानसाब. (वय. ४१ वर्षे. रा.बाराईमाम गल्ली, बसवकल्याण, ता.बसवकल्याण, जि.बिदर, राज्य कर्नाटक), आरोपी दस्तगिर महबुबसाब उर्फ अल्लाबक्ष बाहशावाले, (रा.इस्लामपुर, ता.बसवकल्याण, जि.बिदर, राज्य.कर्नाटक). यातील आरोपी जाहीर सुलतान बागवान यास गुन्हयात अटक करून गुन्हयात चोरीस गेलेल्या मालापैकी १३ टन ११५ किलो वजनाच्या ४ व ६ एम.एम च्या लोखंडी प्लेट जप्त करण्यात आलेल्या आहेत. यातील आरोपी नं. २ हा फरारी असुन त्याचा शोध सुरू आहे. सदरची कामगिरी ही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील, बारामती अपर पोलीस अधीक्षक जयंत मिना, दौंड उपविभागिय पोलीस अधीकारी डॉ. सचिन बारी व यवतचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पो.उपनिरी.रामचंद्र घाडगे, पो.ना.गणेश पोटे,पो कॉ.विजय भापकर यांनी केली आहे