पुणे दि १०:- : – बाणेर पाषाण लिंक रोड येथे कारमधून उतरून पायी चालत निघालेल्या तरुणाला अचानक समोर आलेल्या चोरट्यांनी तुच आमच्या साहेबांची चीप चोरल्याचे म्हणत जबरदस्तीने थांबविले. त्याचे खिसे तपासले आणि खिशातील रोकड व पाकिटातून ८ हजार रुपये काढून घेतल्याची घटना घडली आहे. तुकाराम शाळेजवळ बाणेर-पाषाण लिंक रोडवर हा प्रकार झाला आहे.या प्रकरणी माणिक मांडे (वय २५, रा. बालेवाडी) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अनोळखी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कामानिमित्त त्यांच्या कारने गुरूवारी साडेचार वाजण्याच्या सुमारास बाणेर पाषाण-लिंक रोडवर आले होते. फिर्यादींनी दिलेल्या माहितीनुसार, येथील मी तुकाराम शाळेजवळ आल्यानंतर अचानक फिर्यादींसमोर काही तरूण येऊन उभे राहिले. त्यांनी आमच्या साहेबाची चिप तुच घेतली असून, ती परत देण्यास सांगितले. तसेच जबरदस्तीने त्यांचे खिशे तपासले. तसेच, खिशातील रोकड, पाकिटा मधील ८ हजार रूपये व इतर कागदे काढून घेतली. व पाकिट परत दिले. तसेच, पोरं मारण्यासाठी येतील म्हणून भिती दाखवून तेथून पळवून लावले. त्यानंतर आरोपी पसार झाले. अधिक तपास चतु:श्रृंगी पोलीस पो.हवा मारूती पारधी करत आहेत.