श्रीगोंदा दि १५:- श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीतील तालुक्यातील हिंगणी गावच्या शिवारातील नदीच्या पात्रात अनाधिकृतपणे, विनापरवाना चोरून वाळू वाहतूक करणाऱ्यां ट्रक वर बेलवंडी पोलिसांनी मंगळवार दि.१४ रोजी रात्री उशिरा सापळा लाऊन छापा टाकून सुमारे ९ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून वाळू वाहतूक करणारे ट्रक चालक-मालक यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की मंगळवार दि. १४ रोजी रात्री उशिरा अहमदनगर पोलिस व बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद माने यांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार श्रीगोंदा तालुक्यातील हिंगणी गावच्या नदीच्या पात्रात काही इसम अवैध वाळू उपसा करून ट्रकच्या सहाय्याने वाहतूक करत आहेत. अशी माहिती मिळताच पो. नि.अरविंद माने, बेलवंडी पोलिस ठाण्याचे कर्मचारी व अहमदगर पोलिस हे नदी पात्रात जाऊन वाळू वाहतूक होत असल्याची खात्री करून घेतली. खात्री झाल्यानंतर त्यांनी सापळा रचून वाळू वाहतूक करत असलेली ९ लाख रुपये किमतीची ट्रक क्रमांक एम.एच.१६.ए.ई. ६२९१ व त्यातील ३० हजार रुपये किमतीची वाळू जागीच पकडले. पकडलेला ट्रक व त्यांतील वाळूसह पंचनामा करुन ताब्यात घेण्यात आले असून. रात्रीच्या अंधाराला फायदा घेत ट्रक ड्रायव्हर फरार झाला असून याबाबत बेलवंडी पोलीस ठाण्यात पोलिस कॉन्स्टेबल रोहित मिसाळ याच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला असून. ही कारवाई पोलीस उपधिक्षक कर्जत संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरविंद माने, स.फौ.गवळी, पो.ह.मधुकर सुरवसे, संभाजी शिंदे, पो.ना. झावरे, पो. हे. कॉ. विजयकुमार वेठेकर, पो.कॉ. देशमुख, पो. कॉ.ज्ञानेश्वर पठारे, पो. काँ. बारवकर यांनी केली.
श्रीगोंदा प्रतिनिधी :- योगेश चंदन,