पिंपरी दि १६: – मोहन नगर चिंचवड येथील बँकेच्या एटीएम मशीनचे लोक बनावट चावीने खोलून व गोपनीय पासवर्डच्या सहाय्याने मशीन उचकटून त्यातील सुमारे २ लाख ८८ हजार ४०० रुपये चोरटयांनी लंपास केले. ही घटना बुधवारी (दि. 15) दुपारी साडे बाराच्या सुमारास पिंपरीतील हॉटेल डबल ट्री हिल्टनसमोर युनिअन बँकेच्या एटीएम केंद्रात उघडकीस आली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर बाबर यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक ग्राहक बुधवारी दुपारी हॉटेल डबल ट्री हिल्टनसमोर युनिअन बँकेच्या एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी गेला. मात्र एटीएम मशीन बंद असल्याने त्याने बँकेला याबाबत माहिती दिली. बँकेचे अधिकारी एटीएम केंद्रात पाहणी करण्यासाठी गेले. एटीएमच्या ड्रॉवरची तपासणी केली असता तो ड्रॉवर बँकेच्या गोपनीय पासवर्डचा सहाय्याने उघडून त्यातील रोकड लंपास केल्याचे निदर्शनास आले.अधिकाऱ्यांनी याबाबत पिंपरी पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.मशीनचा ट्रे उघडण्यासाठी दोन वेगवेगळ्या प्रकारचे पासवर्ड टाकावे लागतात. हे पासवर्ड अतिशय गोपनीय असल्याने या घटनेमुळे बँकेच्या अधिकाऱ्यांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे. पोलिसांनी घटनेचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. व पुढील तपास पोउनि निमगिरे करीत आहे