पुणे ग्रामीण दि १७ :- इंदापूर पोलिस स्टेशन हद्दीत नरसिंगपूर तालुक्यातील भांडगाव येथे येथे भीमा नीरा नदी संगमावर नदीच्या पात्रातून वाळू उपसण्याची कोणतीही परवानगी नसताना अवैध रित्या वाळू उपसा करून त्या वाळूची चोरी करीत आहे. अशी गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती व
चंद्रशेखर यादव यांनी नियोजन करून अधिकारी व जवान यांनी सदर ठिकाणी अचानक छापा मारला आसताना सुमारे ६० लाख रूपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच ४ चालक आणि ४ मालक यांना अटक करण्यात आली आहे.या प्रकणी इंदापूर पोलीस ठाण्यात ८ आरोपीन वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुणे जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्याचे आदेश मा. संदीप पाटील पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी दिले होते. मात्र, छुप्या पद्धतीने काही ठिकाणी अवैधरित्या वाळू उपसा व ईतर अवैध धंदे सुरु आहेत. आशी गोपनीय खबऱ्या मार्फत या पथकाला ही माहिती मिळाली होती व अवैधरित्या वाळू उपसा करून त्या वाळूची तस्करी करत आहेत व काही दिवसापूर्वी आमच्या प्रतिनिधीने बातम्याही लावल्या होत्या अवैद्य वाळू माफियांकडून स्थानिक नागरिकांना मारहाण करण्याची बातमी प्रसिद्ध केली होती व तक्रार दाराकडून पोलिसांनी वाळू माफिया वर गुन्हा ही दाखल केला होता व वादविवाद होत आहेत अशा तक्रारी श्री जयंत मीना सो अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती यांना प्राप्त झाल्या होत्या. त्यावरून त्यांनी बारामती क्राईम ब्रँच चे प्रमुख चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक यांना सांगून त्यांना सदर ठिकाणी रेड करणे बाबत सांगितले असता त्यांनी त्या अनुषंगाने इंदापूर पोलीस स्टेशन हद्दीत नीरा नरसिंगपूर व भांडगाव येथे जाऊन माहिती घेऊन अचानक छापा टाकला असता सदर ठिकाणी आरोपी हे बेकायदेशीररीत्या विनापरवाना वाळू उपसा करत असताना मिळून आले व. त्यांना ताब्यात घेऊन खालील वर्णनाचे साहित्य जप्त करून इंदापूर पोलिसांचे जप्त केले आहेत
1) ४५ लाख रू/- ३ जेसीबी मशीन प्रत्येकी किंमत 15 लाख रुपये
2) १५ लाख/- रु च्या ३ ट्रॅक्टर, 3ट्रॉली प्रत्येकी किंमत ५ लाख रुपये अशी एकूण ६० लाख रुपयचा मुद्देमाल.इंदापूर पोलीस ठाण्यात ४ चालक आणि ४ मालक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करन्यात आला आहे.सदरची कामगिरी- संदीप पाटील सो, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण जयंत मीना सो, (आयपीएस) अप्पर पोलीस, अधीक्षक बारामती विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती क्राईम ब्रँच चे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, यवत पो स्टे चे एपीआय श्री मनोज पवार,बारामती क्राईम ब्रँच चे पोलीस जवान सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, स्वप्निल अहिवळे, शर्मा पवार, विशाल जावळे, चालक सतीश मोरे आरसीपी पथकातील १२ पोलिस जवान यांनी कामगिरी केली आहे.तसेच- इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलीस अधिकारी एपीआय अजित जाधव पोलिस जवान वैभव भापकर, अस्ताक अली काझी यांनी आणि महसूल विभागाचे मंडल अधिकारी उदयसिंह कदम, तलाठी शिवाजी बिराजदार, बंडू आव्हाड सदर कारवाई कामी मदत केली