टेंभुर्णी दि १८ :-प्रतिनिधी -टेंभुर्णी शहरातील ऋषभ मोबाईल शॉपिचा पत्रा उचकटून अज्ञात चोरट्यानी दुकानातील लॅपटॉप पेनड्राइव्ह,ब्लुटूथ असे मिळून २५ ते ३० हजाराचे साहित्य चोरून नेल्याची घटना शुक्रवारी रात्री ते शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली.याबाबत अधिक माहिती अशी की,करमाळा चौकातील ऋषभ मोबाईल शॉपी व जय किसान अग्रो ही दोन दुकाने छतावरील पत्रा उचकटून फोडली असून दुकानात शिरून साहित्य चोरून नेले.तसेच दुकानाचे नुकसान केले आहे.अज्ञात चोरट्यानी ऋषभ मोबाईल शॉपी या दुकानाचा पत्रा उचकटून दुकानातील लॅपटॉप,पेनड्राइव्ह,ब्लुट्युथ,मेमरी कार्ड,पॅन कार्ड असे २५ ते ३० हजाराचे साहित्य चोरून नेले.
याबाबत ऋषभ संजय चंकेश्वरा (वय-२३)याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.तसेच त्यास शेजारील जयकिसान अग्रो या दुकानाचाही छतावरील पत्रा उचकटून किरकोळ साहित्याची चोरी केली असून दुकानाचे नुकसान केले आहे.यापूर्वीही चोरट्यानी शहरातील अनेक दुकानांना टार्गेट केलेले आहे.मात्र चोरट्यांचा तपास लावण्यात पोलिसांना अपयश आले आहे.
प्रतिनिधी मु.पो.टेंभुर्णी ता.माढा जि सोलापुर :- अनिल जगताप