भोर दि २२ :- वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत मोरगाव तरडोलि येथे पत्याच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी जुगार अड्डावर धाड. १७ जणांना अटक करण्यात आली आहे. मोरगाव तरडोलि पत्यांचा जुगार अड्डा सुरु असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.होती व मोरगाव तरडोलि येथे अवैध पत्त्याचा क्लब आहे अशी माहिती माननीय श्री जयंत मीना सो. (आय पी एस ) अप्पर पोलीस अधीक्षक बारामती यांना बातमीदार मार्फत मिळाली असता त्यांनी बारामती क्राईम ब्रँच चे प्रमुख चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक यांना सांगून त्यांना सदर ठिकाणी रेड करणे बाबत सांगितले असता त्यांनी त्या अनुषंगाने वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत तरडोली येथे जाऊन माहिती घेऊन बारामती क्राईम ब्रांच चे पोलीस जवान आणि वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे अधिकारी आणि जवान यांच्यासह अचानक छापा टाकला असता सदर ठिकाणी पत्र्याच्या शेड मध्ये 15 इसम हे पत्त्यांवर पैसे लावून पैशाचे हारजीत चा खेळ खेळताना मिळून आले. त्यांना ताब्यात घेऊन खालील वर्णनाचे साहित्य जप्त केले आहे-1)79,350 /- एकूण रोख रक्कम 2) 4,000/- दोन लाकडी टेबल 3) 4,000/- वीस प्लास्टिक खुर्ची
4) 00/- पत्त्याचे कॅट 5)91,000/- बारा मोबाईल हँडसेट 6)1,17,000/- आठ मोटार सायकल 7) 4,00,000/- एक टाटा सफारी6,95,350 /- एकूण मुद्देमाल व आरोपी
1) अमोल किसन मदने,2) बाळासाहेब वांजळे,3) लोणकर हे तिघे मिळून क्लब चालवत होते यांचेसह एकूण 17 आरोपींविरुद्ध वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी माननीय संदीप पाटील सो, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण. मा. जयंत मीना सो, (आयपीएस) अप्पर पोलीस, अधीक्षक बारामती विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती क्राईम ब्रँच चे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सपोनि सोमनाथ लांडे, वडगाव निंबाळकर पो स्टे, पोलीस जवान सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, स्वप्निल अहिवळे, शर्मा पवार, विशाल जावळे, तसेच आरसीपी पथकातील 10 पुरुष 2 महिला जवान पोलिस जवान यांनी तसेच-वडगाव निंबाळकर पो स्टे चे पोसई राजाराम साळुंखे, पोलीस जवान संजय मोहिते आदींनी कारवाई केली तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी तेथे छापा घातला व जुगार खेळणाऱ्या १७ जणांना ताब्यात घेतले.असुन त्यांच्याकडून ६ लाख ९५ हजार ३९५ रुपये रुपयांचे जुगाराचे साहित्य असा ऐवज जप्त करण्यात आला आहे.या सर्व १७ जणांना अटक केलीआहे व पुढील तपास वडगाव निंबाळकर पो स्टे करीत आहे