पुणे दि ०७ :-भारती विद्ापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रूनरशिप डेव्हलपमेंट (आय एम ई डी) मध्ये एक्सप्रेशन्स २०२० या मॅनेजमेंट कल्चरल फेस्टिव्हल चे उद्धाटन आज ७ फेब्रुवारी रोजी झाले. वरिष्ठ सह पोलीस आयुक्त मच्छींद्र चव्हाण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रतिभा जोशी, सीए डॉ. मोहित अगरवाल यांच्या हस्ते फेस्टिव्हलचे उद्घाटन झाले.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा हा फेस्टिव्हल ९ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.टेक्नीकल प्रेझेंटेशन स्पर्धेपासून, कला, वक्तृत्व, नृत्य, फेस पेंटींग, पुस्तक समीक्षण असे अनेक उपक्रम या तीन दिवसात आयोजित करण्यात आले आहेत. आयएमईडी चे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांनी स्वागत केले.
फेस्टिव्हल संयोजक डॉ. प्रवीण माने, प्राध्यापक, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
भारती विद्यापीठ एरंडवणे कॅम्पस येथे फेस्टिव्हलचे उद्घाटन झाले.
‘ विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ निर्माण करणे, ही स्वागतार्ह गोष्ट आहे.कला, आणी शिक्षण या गोष्टी आयुष्यभर वृद्धींगत होत राहतात, मात्र, रॅगिंग आणि ड्रग्ज या गोष्टींपासून विद्यार्थ्यांनी दूर राहावे ‘ असे उद्गार मच्छींद्र चव्हाण यांनी यावेळी बोलताना काढले.
‘ युवतींकडे जन्मतःच सहनशक्ती जास्त असली तरी, अन्याय होताना पाहिले की त्यांनी शक्ती वापरावी ‘, असा सल्ला प्रतिभा जोशी यांनी दिला. ‘ आजच्या युगात स्वतःच्या प्रतिभा आणि कौशल्याने आंत्रप्रुनरशीप द्वारे यशस्वी उद्योजक व्हावे, ‘ असे डॉ.आगरवाल यांनी सांगीतले.