बारामती, दि १७ :- बारामती पोलीस स्टेशन हद्दीत सांगवी ते तावरे वस्ती रोड येथे पत्याच्या जुगार अड्ड्यावर पुणे ग्रामीण पोलिसांचा जुगार अड्डावर छाप्या १२ जणांना अटक .सांगवी येथे तावरे वस्ती रोड लगत पत्यांचा जुगार अड्डा सुरु असल्याची गोपनीय माहिती माहिती पोलिसांना मिळाली होती व बारामती क्राईम ब्रँच चे पोलीस अधिकारी आणि बारामती पोलिस स्टेशनचे अधिकारी व पोलिस जवान तसेच पथकातील पोलिस जवान यांचेसह केली कारवाई..सांगवी येथे सांगवी ते तावरे वस्ती रोड लगत अवैध पत्त्याचा क्लब आहे अशी माहिती जयंत मीना सो. आय पी एस अप्पर पोलीस अधीक्षक बारामती यांना बातमीदार मार्फत मिळाली असता त्यांनी बारामती क्राईम ब्रँच चे प्रमुख चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक यांना सांगून त्यांना सदर ठिकाणी रेड करणे बाबत सांगितले असता त्यांनी त्या अनुषंगाने श्री जयंत मीना सो. (आय पी एस) अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती, पुणे ग्रामीण यांना बातमीदार मार्फत मिळाली असता त्यांनी बारामती क्राईम ब्रँच चे प्रमुख श्री चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक यांना सांगून त्यांना सदर ठिकाणी रेड करणे बाबत सांगितले व बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीत सांगवी ते तावरे वस्ती रोड लगत येथे जाऊन माहिती घेऊन बारामती तालुका पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री घोलप आणि बारामती क्राईम ब्रांच चे पोलीस जवान आणि बारामती तालुका पोलीस ठाण्याचे जवान यांच्यासह अचानक छापा टाकला असता सदर ठिकाणी माळावर पत्र्याच्या शेडमध्ये 12 इसम हे पत्त्यांवर पैसे लावून पैशाचे हारजीत चा खेळ खेळताना मिळून आले. त्यांना ताब्यात घेऊन खालील वर्णनाचे साहित्य जप्त केले- 1) 38,510 /- एकूण रोख रक्कम 2) 10,000 /- 2 लाकडी टेबल 3) 2,400 /- 12 प्लास्टिक खुर्ची 4) 00/- पत्त्याचे कॅट 2 5) 50,000 /- 5 मोटर सायकल 6) 12,500 /- 6 मोबाइल हँडसेट1,13,410 एकूण मुद्देमाल आरोपी1) निसार आयुब शेख 2) रमेश भिकू कांबळे3) अमोल विजय कांबळे 4) राजेंद्र दादासो शिंदे सर्व राहणार सांगवी, तालुका बारामती, जिल्हा पुणे हे सदर क्लबचे मालक असून त्याच्यासह एकूण 12 आरोपी विरुद्ध बारामती तालुका पोलीस स्टेशन जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी माननीय संदीप पाटील सो, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण. मा. जयंत मीना सो, (आयपीएस) अप्पर पोलीस, अधीक्षक बारामती विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती क्राईम ब्रँच चे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,बारामती तालुका पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री आण्णासाहेब घोलप, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे बारामती क्राईम ब्रांच चे पोलीस जवान सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, स्वप्निल अहिवळे, शर्मा पवार, विशाल जावळे, तसेच आरसीपी पथकातील 9 पुरुष 3 महिला पोलीस जवान तसेच-बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पो स्टे चे पोलीस जवान जयंत ताकवणे, रमेश नागटिळक, निखिल जाधव, योगेश चितारे, आदींनी कारवाई केली..