पुणे दि१९ : – सातारा येथील यातील तक्रारदार यांचे मामाचे मुलास फसवणुकीचे गुन्ह्यात आरोपी न करण्याकरीता आरोपी न करण्यासाठी 20 लाखाच्या लाचेची मागणी करून 4 लाख रूपये घेणारा पोलिस उपनिरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात 4 लाख रूपये घेताना उपनिरीक्षकास रंगेहाथ पकडण्यात आले आहे.ज्ञानेश्वर अशोक दळवी (33, सध्या रा. फ्लॅट नंबर -6, व्यंकटेश प्राईड, भडकमकरनगर फलटण, ता. फलटण, जि. सातारा. मुळ रा. मु.पो. मलठण, ता. दौंड) असे लाच घेणार्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी 32 वर्षीय तक्रारदाराने अॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली आहे. तक्रारदाराच्या मामाच्या मुलास फसवणुकीच्या गुन्हयात आरोपी न करण्यासाठी उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी यांनी 20 लाख रूपयांची लाच मागितली होती.तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार नोंदवली. दि.१७ फेब्रुवारी रोजी तक्रारीची खातरजमा करण्यात आली. त्यामध्ये दळवी लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर अधीक्षक सुषमा चव्हाण, संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधिक्षक अशोक शिर्के, पोलिस अधिकारी संजय साळुंखे, विनोद राजे, विशाल खरात आणि तुषार भोसले यांनी सापळा रचला. त्यावेळी सरकारी पंचासमक्ष उपनिरीक्षक दळवी यांनी 4 लाख रूपये स्वतः घेतले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास अॅन्टी करप्शनचे अधिकारी करीत आहेत.