टेंभुर्णी दि २२ : – पुणे-सोलापूर महामार्गावर कंटेनरने बुलेट मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात बुलेट वरील पशुचिकत्सक तरुण डॉक्टरचा जागीच मृत्यू झाला असून त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे.हा अपघात शनिवारी सकाळी १०.३५ वा.च्या सुमारास माढा तालुक्यातील वेनेगाव हद्दीत सोनाई दूध शीतकरण केंद्राजवळ घडला.याबाबत अधिक माहिती अशी की,भिमानगर येथील पशुचिकित्सक डॉ.प्रशांत
सोपान कुंभार वय-३४ व कैलास दत्तात्रय गिरी (वय-३५) रा.आलेगाव ता.माढा हे दोघे बुलेट मोटारसायकल (क्र-एम.एच-४५-एसी-२१०४) वरून मोडनिंबकडे निघाले होते.ते वेनेगाव हद्दीतील सोनई दूध शीतकरण केंद्राजवळ आले असता.त्यांच्या मोटारसायकलला कंटेनरने (क्र.एम.एच-१४-ईएम-५९९४) जोरदार ठोकरले.यात गंभीर जखमी होऊन प्रशांत कुंभार यांचा जागीच मृत्यू झाला.तर कैलास दत्तात्रय गिरी हा गंभीर जखमी झाला.अपघातानंतर कंटेनर चालक वाहन घेऊन तसाच पसार झाला.अपघाताची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलीस व महामार्ग पथकाचे पोलीस कर्मचारी हे अपघात स्थळी पोहचले.त्यांनी जखमी कैलास गिरी यास उपचारस पाठवून दिले तर मयत प्रशांत कुंभार यास प्राथमिक आरोग्य केंद्रात आणून दाखल केले.या अपघाताची खबर सुदाम दामू कुंभार रा.आलेगाव खुर्द यांनी दिली असून पोहेकॉ अभिमान गुटाळ हे अधिक तपास करीत आहेत.
टेंभुर्णी, प्रतिनिधी :- अनिल जगताप