बारामती २३ : – या आर्थिक वर्षामध्ये ज्या विकासकामांना मंजुरी मिळाली आहे, तसेच याकरीता मंजूर करण्यात आलेला निधीचा वेळेतच पूर्णपणे वापर करावा, अशा प्रकारच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केल्या.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती दौ-यावर आले होते. यावेळी त्यांनी प्रशासकीय कामांसंदर्भांत अधिका-यांशी चर्चा केली. यावेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, नायब तहसिलदार धनंजय जाधव तसेच इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नीरा डावा कालवा सुशोभिकरण, क-हा नदी विकास आराखडयाची कामे तसेच रस्त्यांच्या कामांचा आढावा घेतला. व ज्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे व त्यासाठी निधी उपलब्ध झाला आहे अशी कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना केल्या.