पुणे ग्रामीण दि २६ :- बारामती शहर व दौंडमध्ये चार गुटखा विक्रेत्यांवर आजूबाजूच्या परिसरामध्ये तसेच केडगाव ता दौड येथे गुटखा सप्लाय करणाऱ्या होलसेल विक्रेते व त्यांचे गुटखा गोडाऊन याची अप्पर पोलिस अधीक्षकांच्या गुन्हे शाखेने छापे टाकले. या छाप्यात २.१४ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला. चार गुटखा विक्रेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूरज रमेश साळुंखे, सचिन संपतलाल कोठारी, हस्तीमल जवाहरलाल पितळे व प्रवीण सुरेश बारवकर अशी गुन्हा दाखल झालेल्या गुटखा विक्रेत्यांची नावे आहेत.
या कारवाईत साळुंखे याच्याकडून ७७ हजार ३५०, कोठारी याच्याकडून ९५ हजार ४६० रुपयांचा तर पितळे याच्याकडून ३७ हजार ९६० व बारवकर याच्याकडून ३७५२ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. बारामतीचे अप्पर पोलिस अधीक्षक जयंत मिना यांना यासंबंधीची माहिती मिळाली होती.
त्यानुसार त्यांनी कारवाईचे आदेस गुन्हे शाखेचे प्रमुख, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना दिले होते.बारामती शहरातील जामदार रस्ता व आमराई परिसरात जात या शाखेने माहिती घेतली. गुन्हे शाखेसह बारामती शहर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी एकत्रित जात छापा टाकला. यावेळी अवैधरित्यासाठा केलेला गुटखा मिळून आला. तो जप्त करण्यात आला असून पुढील कार्यवाहीसाठी अन्न व औषध प्रशासनाशी पोलिसांनी पत्र व्यवहार केला. साळुंखे व कोठारी विरोधात बारामती शहर पोलिस ठाण्यात तर पितळे व बारवकर यांच्या विरोधात यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला.सदरची कामगिरी संदीप पाटील सो, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण.जयंत मीना सो, (आयपीएस) अप्पर पोलीस, अधीक्षक बारामती विभागयांच्या मार्गदर्शनाखाली
बारामती क्राईम ब्रँच चेपोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,
बारामती शहर पोलीस स्टेशन चेपोलीस निरीक्षक श्री औदुंबर पाटील, सपोनि गणेश शिंदे,बारामती क्राईम ब्रँच चे पोलीस जवान सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, स्वप्निल अहिवळे, शर्मा पवार, विशाल जावळे, तसेच आरसीपी पथकातील 9 पुरुष 2 महिला जवान पोलिस जवान यांनी तसेच-बारामती शहर पोलीस स्टेशन चे पोलिस जवान सिद्धेश पाटील नी कारवाई केली..