पुणे दि ०५ :- कोथरुडमधील सुतारदरा परिसरात टवाळखोर गुंडांवर कारवाईची मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे आमदार माननीय श्री. चंद्रकांतदादा पाटील यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली कोथरुडमधील सुतारदरा परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये व वर्चस्व राखण्यासाठी टवाळखोर गुंडांकडून सतत दहशत पसरवली जात आहे. यासाठी परिसरातील वाहनांच्या तोडफोडीच्या घटना सतत घडत असून यामुळे नागरिकांमध्येही भितीचे वातावरण आहे. तसेच या तोडफोडीमुळे परिसरातील नागरिकांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.या घटनांवर नियंत्रण आणण्यात पोलीस प्रशासनाला अपयश येत असल्याने, राज्य शासनाने गंभीर दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी श्री पाटील यांनी यावेळी केली.