पुणे ग्रामीण दि ०६ :- पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा (एल.सी.बी.) पथकाने पुणे लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हद्दीत उरुळीकांचन येथील बेकायदेशीरपणे ताडी व दारू विक्री करणाऱ्या दोन अड्डयांवर छापा २ हजार ४० रुपयाची ताडी व विदेशी दारू जप्त करून कारवाई केल्याची माहीती गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.
पुणे ग्रामीण जिल्हयात अवैध धंदयावर कारवाई करणेसाठी पोलीस अधीक्षक संदिप पाटील यांनी आदेश दिले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली नेमलेले गुन्हे शाखेचे पोलीस पथकातील पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, विजय माळी, राजेंद्र पुणेकर, महेश गायकवाड, निलेश कदम, गुरू गायकवाड, दैवशिला डमरे यांचे पथकास दिनांक ५ मार्च २०२० रोजी लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हद्दीत उरूळीकांचन, जय मल्हार रोड, सुतार आळी येथे अवैध ताडी व दारू विक्री होत असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती. त्यामुळे सदर पथकाने उरूळीकांचन दुरक्षेत्राचे पोलीस नाईक विजय घाले व नाना पवार यांची मदत घेवून सायंकाळचे सुमारास जयमल्हार रोड, सुतार आळी येथे दोन ठिकाणी अचानक छापे टाकून बिगर परवाना व बेकायदेशीरपणे विक्रीसाठी साठा केलेली ९ लिटर ताडी, विदेशी दारू व इतर साधने असा एकूण किंमत रूपये २,०४०/- चा माल जप्त केलेला आहे. बेकायदेशिर ताडी अड्डा चालविणारा इसम अनंता नागप्पा भंडारी व दारू विक्री करणारी महिला अलकाबाई हनुमंत कांचन दोघे रा.उरुळीकांचन, जयमल्हार रोड ता.हवेली जि.पुणे या दोघांवर मुंबई दारूबंदी कायद्यान्वये लोणीकाळभोर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.पुढील तपास लोणीकाळभोर पोलीस स्टेशन करीत आहे.