पुणे दि १५ :- पुणे शहरात दि १३ / ०३ / २०२० रोजी युनिट – १ , गुन्हे शाखा पुणे शहर यांचेकडील स्टाफ पुणे शहराचे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना अपर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा अशोक मोराळे सो यांना मिळालेल्या खात्रीशीर बातमी वरुन पेट्रलींग पथकाने संशयावरुन इसम नामे अजय शंकरलाल गांधी वय – ३९ वर्षे , रा . मस्तानीबाग अपार्टमेंट , फ्लॅट नं . २ बी विंग , शिवदर्शन चौक , पुणे यास ताब्यात घेतले . अधिक चौकशीत यातील आरोपी अजय शंकरलाल गांधी हा त्याचे राहते घरात त्याने वापरलेल्या नावांच्या कंपनीस कोणतीही मान्यता व परवाने नसतांना सुध्दा , ते पैधरीत्या उत्पादन केलेले , प्रमाणीत आणि दर्जेदार सॅनिटायझर आहेत असे भासवून ते विक्री करण्याकरीता छोटया छोटया प्लॅस्टीकच्या बाटल्यात भरून त्यावर दर्शन स्टिकर पेपर्सकडे बनवून घेतलेले स्टेरीरिअल व सॉफ्टटच या नावाचे बनावट स्टीकर लावून तयार करून त्यायोगे लोकांची फसवणूक करून , स्वतःचा व भगीदारांना अधिकचा आर्थीक लाभ मिळविणेसाठी , बनावट सॅनिटरयझर आहे व ते वापरलेने वापरना – याची सुरक्षीतता धोक्यात येईल याची जाणीव असतानाही ते विक्रीसाठी उत्पादन करत असल्याचे आढळून आले आहे , यासाठी त्याने बाजारातील नामांकीत ब्रैडचे स्टिकर्स वापरल्यामुळे ही उत्पादने वापरनाराची दिशाभुल होणार आहे याची पुर्णपणे जाणीव असतानाही अशाप्रकारे उत्पादन करीत असल्याचे आढळून आले आहे . यासाठी अजय गांधी याने वरील पत्यावरील त्याचे राहते घेरात अशा प्रकारचा उद्योग सुरु केला होता . त्याचे घराचे घरझडतीमध्ये प्लॅस्टीकचे पांढ – या रंगाचे लिक्विडने भरलेले ५ लिटरचे ओशाईन असे इंग्रजीत लिहीलेले प्लॅस्टीकचे केंन तसेच मिडासकेअर असे इंग्रजीत लिहीलेले ५ लिटरचे प्लॅस्टीकचे मोकळे कॅन , तसेच फिक्कट निळ्या रंगाच्या व काही लाल रंगाच्या छोटया बाटल्या त्यामध्ये काहींमध्ये लिक्वीड भरलेले व काही रिकाम्या , वेगवेगळे स्टीकर सॉफ्टटच असे लेबल असलेले गुलाबी छोटया प्लॅस्टीक बाटल्या , स्टेरीरिअल असे लेबल असलेल्या निळ्या रंगाच्या छोटया बाटल्या , रिकाम्या निळ्या रंगाच्या बाटल्या . ओशाईन असे लेबल असलेले रिकामे कॅन , बॉटल कॅप हिरव्या , पांढया व गुलाबी रंगाच्या , प्लॅस्टीकच्या रिकाम्या हँडवॉश बाटल्या , प्लॅस्टीकच्या रिफीलींगच्या बाटल्या , स्टेरीरीअलचे दर्शन स्टीकर पेपर्सकडून प्रिंट केलेले सॉफ्टटेकचे व स्टेरीरीअलचे स्टीकर , बिलाच्या पावत्या व डायरी , डीस्पो न सिरीज असा एकुण १ लाख,२ हजार , ४९१ रु . चा माल मिळून आलेने तो गुन्हयाचे पुरावे कामी पंचनाम्याने पोलिसांनी जप्त केला आहे . अशी अनेक प्रकारची साधने मिळून आलेली आहेत . यातील मालाबाबत पहाणी करता ओशाईन या नावाच्या कॅन्स्वर औषध च सौदर्य प्रसाधने कायदया अंतर्गत बंधनकारक असलेला उत्पादनाचा परवाना क्रमांक नमुद नाही . सदर ठिकाणी मिळून आलेल्या मालाची व साहित्याची खातरजमा व पडताळणी करणेकरीता औषध निरीक्षक खेडेकर व. तासखेडेकर सो , यांनाही पाचारण करणेत आले होते . त्यांनी सदर मालाचे नमुणे काढून तपासणीकामी घेतले आहेत . सदर बाबत दत्तवाडी पोलीस ठाणे गु . र . नं . ८८ / २०२० प्रमाणे औषधे व सौंदर्य प्रसाधन कायदा १९४० कलम १८ ( सी ) सह २७ ( ए ) , तसेच भा . दं . वि . क . ३३६ , २७६ , ४२० आणि आवश्यक वस्तु अधिनीयम कलम – ३ सह ७ प्रमाणे आज दि – १४ रोजी ०६ . ५० वाजता गुन्हा नोंद झालेला आहे , ( काल रोजी केंद्र सरकारने हँड सॅनीटायझर्सचा समावेश आवश्यक वस्तुंमधे केलेला आहे ) आरोपी इसम नामे १ ) अजय शंकरलाल गांधी वय ३१ वर्षे , रा . मस्तानीबाग अपार्टमेंट , फ्लॅट नं . २ बी विंग , शिवदर्शन चौक , पुणे २ ) मोहन वाघाराम चौधरी , वय ३६ वर्ष , रा , शास्त्रीनगर , येरवडा पुणे ३ ) सुरेश प्रेमजी छेडा , वय ३९ वर्षे , रा . शनिवार पेठ पुणे यांना गुन्ह्याचेकामी अटक करणेत आली आहे . त्यांना मे . खराडे सो यांचे कोर्टात हजर केले असता तपासकामी तिन दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे . गुन्ह्याचे तपासामध्ये हे बनावट सेंनीटायझर कोठे तयार केले आहे याचा शोध घेतला असता ९० फुटी रोड , साकीनाका मुंबई येथे हा कारखाना मिळून आला असुन कोणत्याही वैध परवाने व परवाणग्यांशीवाय अतीशनिष्काळजीपणे तेथे हे काम सुरू असल्याचे आढळून आलेने ते संपुर्ण युनीट मशीनरीसह जप्त करण्याची कारवाई करण्यात आलेली आहे . सदरची कामगिरी मा . अपर पोलीस आयुक्त , गुन्हे अशोक मोराळे पोलीस उप आयुक्त , गुन्हे , बच्चन सिंह सो , सहा , पोलीस आयुक्त , शिवाजी पवार सो तसेच सहा . पोलीस आयुक्त विजय चौधरी सो यांचे मार्गदशनाखाली युनिट – १ , गुन्हे शाखा , पुणे शहरचे पोलीस निरीक्षक अरुण वायकर , पोलीस उपनिरीक्षक उत्तम बुदगुडे , हनुमंत शिंदे , पोलीस कर्मचारी , अजय जाधव , जितुसींग वसावे , अमोल पवार , अजय थोरात , प्रकाश लोखंडे , गजानन सोनुने , तुषार माळवदकर , अशोक माने , योगेश जगताप , बाबा चव्हाण , सुभाष पिंगळे , इरफान मोमिन , श्रीकांत वाघवले , सुधाकर माने यांनी केली आहे .