पुणे दि १७ :-पुणे ग्रामीण परिसरात अवैध धंदयावर कारवाई करणेसाठी मा.पोलीस अधीक्षक यांनी आदेश पुणे ग्रामीण पोलिसांना दिले होते. व स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली नेमलेले गुन्हे शाखेचे पोलीस पथकातील सहा.पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, महेश गायकवाड, निलेश कदम, उमाकांत कुंजीर, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, गुरू गायकवाड, अक्षय जावळे यांचे पथक आज दिनांक दि.१७ रोजी लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हद्दीत उरुळी कांचन येथे पेट्रोलिंग करीत असताना पथकास, उरुळीकांचन-जेजूरी रोडने लाल रंगाचे मारुती बलेनो कार नंबर नं. एमएच १२ पीएन ५२६० मधुन देशीविदेशी दारूचा साठा बेकायदेशीर विक्रीसाठी घेऊन येनार आहे आशी गोपनीय माहिती मिळाली होती. पोलिस पथकाने उरुळीकांचन-जेजूरी रोडवर वळती फाटा येथे सापळा रचून शिंदवणे बाजूकडे जाणारे बलेनो कारला थांबवण्याचा प्रयत्न केला. आसता ती कार न थांबता भरधाव वेगात गेल्याने तिचा पाठलाग करून शिंदवणे येथे हॉटेल धनराज समोर आडवून इसम नामे राहूल उमाकांत मांढरे वय २८ वर्षे रा.मांजरी फार्म ता.हवेली जि.पुणे यास ताब्यात घेवून त्याचे ताब्यातील कारची झडती घेतली असता कारचे मागील डिकीत बेकायदा, बिगरपरवाना विक्रीसाठी चालविलेला देशी विदेशी दारूचा कि.रु.३९,३०४/- चा साठा कारसह एकूण किं ६,३९,३०४/- असा प्रोव्ही. माल मिळून आला आहे.
सदर आरोपी व ताब्यात घेण्यात आलेला मुद्देमाल हा लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेला आहे. आरोपी विरूध्द मुंबई प्रोव्ही.अॅक्ट कलम ६५(ई) प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे हा दारूसाठा कोठून खरेदी केला? त्याची कोठे विक्री करणार होता? तसेच हा माल बनावट आहे का? याबाबतचा पुढील अधिक तपास लोणीकाळभोर पोलीस स्टेशन करीत आहे.