पुणे दि २३ : – कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर कलम १४४ आज पासून लागू करण्यात आले आहे. त्याची अंमलबजावणी सर्वत्र होत असतानाच आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पुणे शहर पोलिसांनी वाहतूकीसंदर्भात एक अतिशय मोठा निर्णय घेतला आहे. आज (सोमवार) दुपारी 3 वाजल्याच्या नंतर 31 मार्चपर्यंत शहरात वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी दिली आहे.कोरानाग्रस्तांच्या संख्येत झपाटयाने वाढ होत आहे. केंद्र आणि राज्य सरकार त्यास आळा घालण्यासाठी अटोकाट प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, पुणे शहरातील वाहतूक पुर्णपणे बंद करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.
यापुर्वी पुणे शहरात अशा प्रकारे वाहतूक कधीही बंद झालेली नव्हती. दरम्यान, दुचाकी आणि चारचाकी वाहनांना देखील बंदी घालण्यात आली आहे.