नीरा नरसिंहपूर : दि.25 :- राजस्थान राज्यातील कोटा याठिकाणी शिक्षणासाठी गेलेले महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थी एक महिन्यापासून अडकून पडलेले आहेत. या अडकून राहिलेल्या विद्यार्थ्यांना राज्यात आणण्याची व्यवस्था राज्य शासनाने करावी, अशी मागणी नवीदिल्ली येथील ऑल इंडिया शुगर मिल असोसिएशन (इस्मा)च्या कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षा व पुणे जि.प.सदस्या कु.अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे पत्राद्वारे केली आहे.
देशात कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादूर्भाव रोखण्यासाठी मागील महिन्यापासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे.या लॉक डाऊनमुळे
महाराष्ट्रातील विद्यार्थी कोटा येथे अडकून पडले आहेत.सदरचे विद्यार्थी वसतिगृह, खाजगी खोल्यांमधून येथे राहत आहेत. लॉक डाऊन त्यामुळे सर्व हॉटेल्स बंद आहेत, त्यामुळे या विद्यार्थ्यांचे भोजनाचे व इतर हाल होत आहेत.या विद्यार्थ्यांना मुळ गावी आणण्याची शासनाने व्यवस्था करणे गरजेचे झाले आहे.उत्तर प्रदेश सरकारने ज्या प्रमाणे त्यांच्या राज्यातील विद्यार्थ्यांना आणण्याची व्यवस्था केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांना देखील कोटा येथून महाराष्ट्रातील मुळ गावी आणण्याची शासनाने व्यवस्था करावी,अशी विनंती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे कु.अंकिता पाटील यांनी या पत्रांमध्ये केलेली आहे.
निरा प्रतिनिधी :-बाळासाहेब सुतार