कोरोना (कोविड-19) विषाणूमुळे सारे जग त्रस्त आहे. शाळांना सुट्टी आहे,बाजारपेठा, खासगी कार्यालये बंद आहेत. या वातावरणात घरीच राहून विद्याथ्यांच्या बुद्धीला चालना,अभ्यास,खेळ,वेळ रमवण्यासाठी सरस्वती शिक्षण संस्था संचलित सदगुरु काडसिद्धेश्वर विद्यालय गुणदे (माध्यमिक) व गुरुकुल विद्यामंदिर गुणदे (प्राथमिक)ता.खेड प्रशालांनी स्तुत्य उपक्रम राबवला आहे.या उपक्रमाची चर्चा सर्वत्र सुरु आहे.अन्य काही शाळांनीही त्यांचा आदर्श घेतला आहे. थोडा वेळ अभ्यास, घरात थोडी मदत,चित्रकला टाकाऊतून टिकाऊ अशा उपक्रमात प्रशालेची मुले रमून गेली.श्रुतलेखन,
शुद्धलेखन, पाढे पाठांतर व इंग्रजी शब्द पाठांतर हा रोजचा अभ्यास सर्व विद्यार्थी करत आहेत. इयत्ता पहिली ते दहावीच्या वर्गांचे वर्गशिक्षक नियमित व्हाटसॅपच्या माध्यमातून,पालकांशी संपर्क साधून अभ्यास देतात. पहिलीसाठी शब्द तयार करण्याचा सराव, स्वरचिन्हांचा वापर करून शब्द लिहिणे, दुसरीसाठी शब्द वाचन, अर्थाकडे लक्ष देणे. इंग्रजीचे शब्द देऊन त्यावर प्रश्न,फळभाज्या,प्राण्यांचे नाव लिहिणे, तोंडी गणित सोडवण्याचा अभ्यास दिला,तिसरीसाठी मुलांना थोड लिहित केलं.अचानक सुट्टी, कोरोना आदी विषयांवर जस सुचेल ते लिहायला सांगितले.इंग्रजी शब्दाची कोडी सोडवणे,स्पेलिंग तयार करणे असे मुले आवडीने करतील असाच अभ्यास दिला जातो.इयत्ता चौथीसाठी पाढे पाठांतर, वाकप्रचार अर्थ, वाक्यात उपयोग,इतिहास वाचन, त्यावरून आपण प्रश्न तयार करणे. इंग्रजी बाराखडी,इयत्ता पाचवी ते सातवीसाठी वाचनालयातून वाचनीय पुस्तके घरी देण्यात आली.कर्सिव लिपीचा सराव,पाठ्यपुस्तक वाचन,नियमित बालोपासना वाचन देण्यात येते.आठवी ते दहावीसाठी सर्व विषयांचे ऑनलाईन तासिकांद्वारे अभ्यास दिला जातो.अंथरुणाच्या घड्या घालणे, केर काढणे, पालेभाजी निवडणे,पोळी करण्याचा यशस्वी प्रयत्न अशा कामात मुले मदत करत आहेत.मुलांवर जसे संस्कार करू तशी मुल घडत जातात, शिक्षक-पालकांनी नक्की योग्य मार्गाने मुलांना व्यस्त ठेवले आहे.प्रत्येक शिक्षकांनी विविध प्रकारे गृहपाठ दिला आहे. पुढचं पाठ मागचं सपाट असं होणार नाही, याचीही काळजी घेतली आहे.अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांचे कलागुणाही दिसून येत आहेत. चित्रकलेतून अनेक कल्पना मांडताना निसर्गचित्र, कोरोनापासून पृथ्वीचा बचाव व्हावा असे दाखवणारे चित्र,व्यक्तीचित्र यातही विविधता पाहायला मिळते.
टाकाऊतून काही वस्तू बनवत आहेत,
बॅडमिंटन, बुद्धिबळ, टेबल टेनिस या खेळाचा सराव सुरू आहे. सतत चंचल असणाऱ्या या छोट्यांच्या हातून उत्तम कलाकृती साकारत आहेत.मुख्याध्यापिका सौ.अश्विनी जोशी यांनी सांगितले की,कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजने अंतर्गत शाळा बंद व सर्व कार्यक्रम रद करण्याच्या शासन आदेशामुळे शाळेला सुट्टी मिळाली. शिक्षकानी नियोजित काम, फाईल्स घरी नेल्या शाळेतील सर्व मुले घरीच असणार, त्यांना रिकामा वेळ मिळणार. मग या मुलांना योग्य कृतीत गुंतवायला हवे, असे जाणवले आणि शिक्षकांना सूचना दिल्या. लेखन, वाचन हवंच पण मुलांना कल्पक कृती द्या,असे सुचवले. सर्व वर्गाचे व्हॉटस्अॅप ग्रुप आहेतच. शिक्षकांनी शोधकपणे गृहपाठ, कृती द्यायला सुरुवात केली. मुलांनी त्या कल्पकराने करायला सुरुवात केली. आई बाबानी प्रोत्साहन दिले. त्याचे फोटो पुन्हा पालक, मुलांनी शिक्षकांना पाठवले, शिक्षकांनी’स.का,वि.गुणदे या अध्यापक वृंदाच्या ग्रुपवर शेअर केले. मुलांवर कौतुकाचा वर्षाव होत होता. कालाकृतीमध्ये कितीतरी विविधताहोती. कोणी योगासने, प्राणायाम, चित्र काढणे, रंगवणे. संगणकाचाही योग्य वापर, गोष्टीचेपुस्तक, वर्तमानपत्र वाचन, टाकावूतून टिकाऊ वस्तू, रांगोळ्या अशा अनेक गोष्टी पालकही मुलांसोबत दिसले. कोणी बुद्धीबळ शिकवतंय, आजी नातीला भाकऱ्या, पोळ्या,पापड लाटायला शिकवतेय, कोणी भाजी निवडतंय, कोणी पियानो, कोणी पेटी शिकतोय, प्रत्येक ठिकाणी पालक होतेच मुलांसोबत, ‘सोशल डिस्टन्सिंग असले तरी कुटुंबातील सारेजण अधिक जवळ आले.मुलांना वेगवेगळ्या संधी मिळाल्या व योग्य अवकाशही, कोरोनामुळेच्या सुट्टीत मुलांना चांगल्या,
सकारात्मकतेसाठी धडा मिळाला
असे मुख्याध्यापिका सौ.जोशी,सौ.विचारे यांनी सांगितले.प्रशालेतील सर्व शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी विशेष प्रयत्न करीत आहेत.दुरदर्शनवर सुरु करण्यात आलेल्या रामायण, महाभारत ,शक्तिमान या मालिका विद्यार्थी आवडीने पाहत आहेत.या सर्व कामगिरीबद्दल सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री.विक्रांत आंब्रे,सचिव सुभाष पवार,संचालक परिवार यांनी कौतुक केले.