टेंभुर्णी दि २५ :- [प्रतिनिधी ] – माढा तालुक्यातील उपळवाटे येथे टेंभुर्णी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे गुटखा कारखाण्यावर छापा टाकून आठ लाख १३ हजाराचा गुटखा,कच्चा माल व गुटका तयार करण्याचे साहित्य पोलिसांनी जप्त केले असून दोन जणांना अटक केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली.ही कारवाई २५ एप्रिल रोजी सकाळी नऊ च्या दरम्यान करण्यात आली.पोपट काशीनाथ भोसले (वय-४७),शंकर पोपट भोसले (वय-१९) दोघे रा.उपळवाटे ता.माढा व चंद्रकांत ज्योतिराम क्षिरसागर रा.निमगाव (टें) ता.माढा अशी गुन्हा दाखल झाला असुन सकाळी दोघांना तर सायंकाळी तिसऱ्या ला आटक अटक करण्यात आली आहेसोलापूर येथील अन्न औषध प्रशासन अधिकारी उमेश सुभाष भुसे यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, टेंभुर्णी- केम रस्त्यावर असलेल्या माढा तालुक्यातील उपळवाटे येथे मोठ्या प्रमाणात घरगुती कारखाण्यात गुटका साठा असल्याची गुप्त माहिती टेंभुर्णी पोलिसांना मिळाली होती.या माहितीचा आधारे पोलिसांनी छापा टाकून नवाब नावाचा गुटका,सुगंधीत तंबाखू कच्चा माल जप्त केला असुन ४ लाख ९२ हजार रुपये किमतीचा नवाब गुटका प्रत्येकी २०० रुपये गोणी प्रमाणे २४० पाकिटे,एक लाख ९८ हजार रुपये किमतीचा ५० किलो वजनाच्या व ५५० रुपये किमतीच्या ११ गोण्या,९३ हजार रुपये किमतीच्या ३१ कि.तसेच ३० हजार रुपये किमतीचे सुपारी व तंबाखू मिश्रण करावयाच्या यंत्राचे सुटे भाग असा सुमारे आठ लाख १३ हजार रूपये किमतीचा माल उपळवाटे येथिल कारखाण्यात मिळाला असुन या बरोबर गुटखा तयार करण्यासाठी आरोपी नी वापरा केलेली गुटखा मिशन ही पोलिसांनी जप्त केली आहे सध्या लाँगडाऊन मध्ये अवैद्य धंद्यावर कारवाई करण्या साठी पोलिस पथक नेमले असुन हे पथक दरोज या भागात कारवाई करत असुन आजही या पथकाने करमाळा विभागिय अधिकारी डाॕ विशाल हिरे पोनि दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय राजेंद्र मगदूम,पोहेकॉ बिरु पारेकर,पोलीस कर्मचारी दत्ता वजाळे,विनोद पाटील,सोहेल पठाण,संजयनन भानवसे,मो.रफी शेख,प्रसाद काटे,राजेंद्र खंडागळे,हरिदास निमगिरे या पोलीस पथकाने केली.याबाबत पोनि दयानंद गावडे व एपीआय राजेंद्र मगदूम हे अधिक तपास करीत आहेत.लॉकडाऊन काळात एवढया मोठ्या प्रमाणात गुटखा मिळाल्याने सोलापुर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
टेंभुर्णी, प्रतिनिधी :- अनिल जगताप