पुणे ग्रामीण दि ०४ :- लोणावळ्यात पाऊसाळ्यात पुणे-मुंबईतील पर्यटक पर्यटनस्थळी येण्याचे दरवर्षी नियोजन करत आसतात व करोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटनस्थळी अद्याप ही बंदी आहे. घातली आहेत तरी ही पुण्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या लोणावळ्यात पर्यटकांचा मुक्त संचार दिसून येतोय. भुशी धरण, टायगर पॉईंट, लायन्स पॉईंटसह विविध पॉइंटवर विनापरवाना पर्यटकांची गर्दी करत आसताना दिसून येत होती. वर विनामास्क फिरत सोशल डिस्टन्सिंगचा न ठेवले जाताना दिसत होते त्यामुळे अशा पर्यटकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला.होता व पुणे-मुंबईहून विनापरवाना लोणावळ्यात येणाऱ्यांना चांगलीच तंबी दिली. त्यानंतर काही दिवस पर्यटकांनी लोणावळ्यात जाणं टाळले. पण कालांतराने पुन्हा पर्यटक लोणावळ्यात वावरू लागले. आहेत.आणि हे विनापरवाना येणारे पर्यटक पोलिसांची नजर चुकवून थेट फार्म हाऊस, रो हाऊस गाठत आहेत. त्यामुळे आता पोलिसांनी फार्म हाऊस, रो हाऊस येथे छापे टाकत कारवाई करायला सुरुवात केलीये. सोमवारी रात्री अकरा वाजता गोल्ड व्हॅली येथील माउंट कॉटेज बंगल्यावर पोलिसांनी धाड टाकत सात पर्यटकांना ताब्यात घेतलं. तर बंगल्याच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
मुंबईहून दोन रिक्षात हे सात पर्यटक लोणावळ्यात दाखल झाले होते. पोलिसांची नजर चुकवत त्यांनी गोल्ड व्हॅली गाठली आणि नंतर माउंट कॉटेज बंगल्यात प्रवेश केला. सोमवारी सायंकाळी आलेल्या या महाभागांनी नंतर पार्टी सुरू केली. दारूच्या बाटल्या ही फुटल्या. बाहेर पोलिसांचं पेट्रोलिंग सुरूच होतं, तेंव्हा बाहेरील दोन रिक्षा आढळल्या. रात्रीची वेळ असल्याने पोलिसांनी जवळ जाऊन पाहिलं असता एमएच ४३ अर्थात मुंबईच्या वाशीतील रिक्षा असल्याचं निष्पन्न झालं. पार्टीत दंग असणाऱ्या महाभागांना बाहेर पोलीस आल्याचा थांगपत्ता ही नव्हता. पेट्रोलिंग कर्मचाऱ्यांना वरिष्ठांना कल्पना दिली. ते घटनास्थळी पोहचताच या पर्यटकांचं बिंग फुटलं. कोरोनामुळे पर्यटनाला बंदी असताना ही, हे सात पर्यटक विनापरवाना शहरात आल्याचं निष्पन्न झालं. तर पर्यटन बंदी असताना माउंट कॉटेज बंगला भाड्याने दिल्याने मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. तर सात पर्यटकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं