पिंपरी चिंचवड दि ०९ : – अखिल भारतीय सेनेच्या पुणे खेड तालुका अध्यक्षासह एका सराईत गुन्हेगाराला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन पिस्टल आणि चार काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. व पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील रेकॉर्डवरील गुन्हेगार , पाहिजे , फरारी , तडीपार व गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना वेळोवेळी चेक करुन , त्यांचेवर प्रतिबंधक कारवाई करुन वचक निर्माण करणे बाबत सुचना व मौखिक आदेश दिल्याने त्याअनुषंगाने दिनांक ०८/०१/२०२१ रोजी खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांच्या अधिपत्याखाली पोलीस उप – निरिक्षक. महेंद्र पाटील , शाकीर जिनेडी , पोहवा हजारे , पोहवा कानगुडे , पोना काटकर , पोना पाटील , पोना गोडांबे , पोना बोटके , पोशि मगर , व पोशि गारगोटे असे रेकॉर्डवरील गुन्हेगार , पाहिजे , फरारी , तडीपार आरोपी व गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणा – या गुन्हेगारांची माहिती घेत पेट्रोलिंग करीत फिरत असताना , जाधव सरकार चौक स्पाईन रोड चिखली प्राधिकरण पुणे येथे आले असता , पोना संदीप पाटील व पोशि शैलेश मगर यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , रेकॉर्डवरील गुन्हेगार रणजित चव्हाण हा त्याचे मित्रासह जगदंब कार वॉशींग सेंटर जवळ , जाधववाडी मोशी रोड चिखली प्राधिकरण पुणे येथे येणार असुन , त्याने अंगात पांढरे रंगाचे फुलबाहयाचे टि शर्ट व निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट असे कपडे घातलेले असुन , त्याचे जवळ पिस्टल सारखे हत्यार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली असता , सदरची बातमी त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांना कळविली असता , त्यांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे , मिळालेल्या बातमीचे ठिकाणी सापळा लावला असता , काही वेळेनंतर मिळालेल्या बातमीतील वर्णनाप्रमाणे व पोलीसांचे रेकॉर्डवरील गुन्हेगार रणजित चव्हाण हा त्याचे एका मित्रासह पायी चालत येऊन , रस्त्याच्या कडेला कोणाची तरी वाट पाहत थांबलेले दिसले , ते पळुन जाणार नाहीत याची खबरदारी घेवुन , त्याना अचनाकपणे १७:३० वा . ताब्यात घेवुन ही कारवाई केली.
रणजित बापु चव्हाण वय-26 रा. वेताळनगर, चाफेकर चौक, चिंचवड, दत्तात्रय किसन गाडे वय-35 रा. मु.पो. येलवाडी, ता. खेड असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.व पिंपरी चिंचवड खंडणी विरोधी पथकाचे पोलीस नाईक संदीप गोपीचंद पाटील यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपी दत्तात्रय किसन गाडे हा अखिल भारतीय सेना या पक्षाचा खेड तालुका अध्यक्ष आहे. तर रणजीत चव्हाण हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर चिंचवड पोलीस ठाण्यात 12, व निगडी 2, वाकड 2, वडगाव मावळ पोलीस ठाण्यात 1 असे खुन, खनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दरोडा तयारी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराईत गुन्हेगार रणजीत चव्हाण हा त्याच्या मित्रासह चिखली प्राधिकरण येथील जगदंब कार वॉशिंग सेंटर येथे येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. व त्यांच्याकडे पिस्टल असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाला मिळाली.होती व मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडीत घेतली असता आरोपी रणजित याच्याकडून 40 हजार रुपये किमतीचे गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. तसेच दत्तात्रय गाडे याच्याकडून ही गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली.आहे सदर
ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र पाटील, शाकीर जिनेडी, पोलीस अंमलदार अशोध दुधवणे, गणेश हजारे, सुनिल कानगुडे, संदीप पाटील, शकुर तांबोळी, किरण काटकर, शैलेश मगर, निशांत काळे, आशिष बोटके, प्रदीप गोडांबे, सुधीर डोळस, अशोक गारगोटे यांच्या पथकाने केली.