पुणे दि २५ : – पुणे शहर व पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक करण्याच्या भीतीने गजानन मारणे हा फरार झाला होता पण आज गजनान पंढरीनाथ मारणे हा वडगाव मावळ कोर्टात हजर झाला. त्याला न्यायालयाने जामीन दिला आहे. यानंतर गजानन मारणे तेथून निघून गेला. त्यामुळे पुणे शहर पोलीस व पिंपरी चिंचवड पोलिसांची पंचायत झाली आहे. तर गजानन मारणे आला आणि निघून गेला, पण कळाले नाही याचीच चर्चा पोलीस दलात सुरू आहे. तळोजा ते पुणे जंगी मिरवणूक काढत गजानन मारणे व त्याच्या साथीदार आणि समर्थकांवर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्याला व इतर 9 जणांना अटक करण्यात आली होती
पोलिसांनी न्यायालयात हजर केल्यानंतर शिवाजीनगर न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला. यानंतर लगेच पोलिसांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल केला. पण तो पर्यंत गजा मारणे फरार झाला. यात पोलिसांनी गजानन मारणे हा पोलिसांचे अटकेच्या कारवाईच्या भीतीपोटी फरार झाला, असल्याचे सांगितले. त्याच्या शोधासाठी पथके देखील रवाना केली. त्याचे फार्म हाऊस आणि कुटुंबाकडे चौकशी सुरू केली. पण आज गजा मारणे हा वडगाव मावळ कोर्टात हजर झाला. या प्रकरणी त्याला कोर्टाने जामीन दिला.. यानंतर तो निघून देखील गेला आहे.संपुर्ण पोलीस दल त्याच्या मागावर आहे. दररोज त्याचा वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस शोध घेत आहेत आणि असे असताना तो आज चक्क कोर्टात हजर झाला आणि जामीन मिळवून निघून देखील गेल्याने पुणे शहरात चांगलीच चर्चा रंगली आहे