पुणे दि ०५ हत्यारानिशी दरोडा टाकणाऱ्या सराईत गुन्हेगारांचांं पाठलाग करून पुणे शहर पोलिसांनी अटक केली आहे. पंचरल सोसायटी . राजा शिवराय प्रतिष्ठाण शाळेजवळ , कोथरूड पुणे याठिकाणी रविवारी रात्री 2.20 वा ही घटना घडली. कोथरूड पोलीस ठाण्यातील रात्रगस्त अधिकारी व पोलीस अंमलदार यांना चोर आल्याची माहिती मिळाल्यानंतर अवघ्या काही मिनीटातच घटनास्थळी जाऊन मोठ्या शिताफीने आरोपींना ताब्यात घेतले.व येथे काही इसम चोरी करणेस आल्याची माहीती मिळालेवरून पोउनि शेळके बीट मार्शल व इतर रात्रग्रस्त स्टाफ सदर ठिकाणी पोहोचले . पोलीस आल्याची चाहूल लागताच त्या ठिकाणी दरोडा टाकणारे दरोडेखोर यांनी बिल्डींगमधून जिन्याने खाली येऊन पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेवर धारदार हत्यारासह हल्ला करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असताना पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी नमूद आरोपींपैकी आरोपी इसम नामे १ . बल्लूसिंग प्रभूसिंग टाक रा . सर्वे नं ११० , रामटेकडी अंधशाळेच्यामागे , वानवडी पुणे , यास घटनास्थळीच व आरोपी इसम नामे २. उजालासिंग पभूसिंग टाक रा . सदर , याचा सुमारे १ किमी पायी पळत पाठलाग करून जिवावर उदार होऊन जिवघेण्या धारदार हत्यारानिशी असणाऱ्या शिताफीने दरोडेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले . त्यांच्याकडे मोठया प्रमाणावर दरोडा टाकणेसाठी कटावण्या , लहान मोठया वेगवेगळया धारदार सु – या , कटर , एक तवेरा गाडी , तसेच दरोडा टाकून मिळविलेले पिवळया धातूचे दागिने व एक घडयाळ असा मुद्देमाल जप्त केला आहे . दरोडेखोर ४ साथीदार यांचा शोध सुरु आहे . ताब्यात घेतलेले आरोपीचा पोलिसांनी पुर्व इतिहासाची माहीती काढली असता आरोपी नामे १ . बल्लूसिंग प्रभूसिंग टाक रा . सर्वे नं ११० , रामटेकडी अंधशाळेच्यामागे , वानवडी पुणे , यांचेविरूध्द ६३ गुन्हे , २.उजालासिंग पभूसिंग टाक रा . सदर . याचेविरूध्द ७२ गुन्हे असे वेगवेगळया पोलीस ठाणेमध्ये वरीलप्रमाणे . खुनाचा प्रयत्न , दरोडा , दरोडयाचा प्रयत्न , घरफोडी व वाहन चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे आढळून आले आहे . काही दिवसापुर्वी चतुःश्रृंगी पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या घटने अनुषंगाने पुन्हा अशी घटना घडू नये म्हणून .पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार यांना रात्रग्रस्त करताना रात्रग्रस्त अधिकारी तसेच बिट मार्शल यांनी करावयाचे नवीन उपाय योजना लागु केल्या होत्या . त्याप्रमाणे कोथरूड पोलीस ठाणेकडील रात्रग्रस्त अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी चोर आल्याची माहीती मिळालेनंतर अवघ्या काही मिनीटाचे आतमध्ये घटनास्थळी जाऊन योग्य नियोजन करून आरोपींकडे धारदार घातक शस्त्रे असताना देखील जिवाची पर्वा न करता दरोडा घालणारे ६ आरोपींपैकी २ आरोपींना मोठया शिताफीने पकडून ताब्यात घेतले . जप्त केलेल्या मुद्देमालामधील तवेरा गाडी ही चोरी झालेबाबत खडकी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असल्याचे आढळून आले आहे . सदरची उल्लेखनिय कामगिरी पोलीस आयुक्त , पुणे शहर अमिताभ गुप्ता , पोलीस सह आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे ,अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग , पुणे , डॉ.संजय शिंदे , पोलीस उप आयुक्त परिमंडळ – ३.पुणे शहर , श्रीमती पोर्णिमा गायकवाड . सहा पोलीस आयुक्त कोथरूड विभाग , पुणे.गजानन टोणपे यांचे मार्गदर्शनाखाली वपोनिरी मेघश्याम डांगे , पोनि.बाळासाहेब बडे यांचे सुचनांप्रमाणे पोउनि शेळके . सपोफौ.सागुंडे , पोहवा चव्हाण , पोशि.सपकाळ , पोशि कुमार , पोशि गायकवाड , पोशि.मरगळे , पोशि.बुरले , पोशि.गजभारे व चालक पोशि.धादवड यांनी वरीलप्रमाणे उत्तम कामगिरी केली आहे .